पोस्ट्स

दुर्लक्षीत समाजाच्या व्यथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

किमान यांची आठवण ठेवत अन्न नासाडी टाळा

इमेज
             आपण आफ्रिका खंडाचा नकाशा बघितला तर आफ्रिका खंडाच्या ईशान्येला गेंड्याच्या शिंगासारखा भाग दिसतो या भागाला सुद्धा  हॉर्न (गेंड्यांच्या शिंगाला हॉर्न म्हणतात ) ऑफ आफ्रिका म्हणतात.  सोमालिआ केनिया इथोपिया आदी देश या भागात येतात सध्या या भागात  मन हेलावून टाकेल अशी  अन्न टंचाई निर्माण झाली आहे  या भागात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाऊस न पडल्याने शेती जवळपास संपलीच आहे शेती नसल्याने तेथील अन्नधान्याची गरज हि युक्रेन या देशातून अन्नधान्यआयात करून भागवली जात होती या भागाच्या एकूण गरजेच्या सुमारे ९८% गरज ही युक्रेन देशातून भागवली जात होती  रशिया युक्रेन युद्धामुळे ही आयात पूर्णतः बंद झाली आहे परिस्थिती इतकी वाईट आज की या भागात दर ४८ सेकंदाने एक भूकबळी जात आहे . तासाला ७२ लोक अन्न नसल्याने प्राणास मुकत आहेत . हॉर्न ऑफ आफ्रिका भागातील देश आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब आहेत त्यामुळे या देशांकडून इतर सधन देशाकडून अन्नधान्य आयात करण्यावर सुरवातीलाच अनेक बंधने आहेत त्यातच निसर्गाने देखील त्यांच्याशी सवतासुभा उभा केल्य...

या आत्महत्यांकडे बघणार कोण ?

इमेज
             मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी मध्ये कार्यरत नसलो,  तरी एसटीचा चाहता आहे एसटीच्या विविध योजनांचा फायदा घेत मी महाराष्ट्र पालथा घातला आहे . माझ्या या छंदामुळे मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी प्रेमींच्या समाज माध्यमांवरील विविध गृपचा सदस्य आहे गेल्या काही दिवसांच्या या गृपवरील पोस्ट बघितल्या तर आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात येते ती म्हणजे या गृपवर  दोन ते तीन दिवसाच्या अंतरावर किमान एका एसटीच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवले असल्याची पोस्ट येत असते .           आतापर्यंत सुमारे दहा ते पंधरा एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे . ज्यांनी जीवन संपवले त्या पैकी बहुसंख्य हे एसटीचा कणा  म्हणता येतील अश्या वाहक आणि चालक या क्षेणीतील कर्मचारी होते .उच्चपदस्थ अथवा एसटीच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी फारच तुरळक प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत  या सर्व कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या आणिउशिराने मिळणाऱ्या पगारामुळे आत्महत्या केली आहे . या आत्महत्या झाल्यावर संबंधित आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास त्य...

मानसिक आरोग्य एक दृलक्षीत घटक

इमेज
         सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषय म्हणजे मानसिक आरोग्य हा होय .सध्याच्या अत्यंत ताण तणावाच्या काळात ज्या कोणत्या प्रकारच्या विकाराने सर्वाधिक लोक पिडीत असतील तर ते आहेत विविध मानसिक रोग . मी विविध हा शब्द वापरतोय . हे लक्षात घ्या , कारण सर्वसाधारणपणे मानसिक रोग म्हंटले की फक्त छिन्नमानसिकता ( स्कीझोफेनिया ) हाच रोग लोकांच्या नजरेस येतो . बाकीचे काही रोग हे मानसिक रोग आहेत हेच त्यांचा लक्षात येत नाही. अनेक मानसिक समस्या या विक्षिप्त स्वभाव या सदराखाली झाकल्या जातात ज्याच्यावर उपचार केल्यास त्या सहज बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात मानसिक आरोग्याबाबत लोकांच्या   गैरसमज म्हणजे समुपदेशक ( consular ) आणि मनोसोपचार तज्ञ यात होणारी लोकांची . फसगत लोकानां दोघांतील फरकच   माहिती नसतो . लोक दोघाना एकेच समजतात .मानसोपचार तज्ञ हे एम बी बी एस + एम दि सायको हे क्षिक्षण झालेले असतात .आणि वैद्यकीय औषध तेच देवू शकतात समुपदेशकांना औषधाबाबत काहीच अधिकार नसतात तर समुपदेशक समुपदेशनाच्या कोर्स झालेले असतात मुख्यत: हा कोर्स एम ए मानाशात्र झालेले करतात मानसिक रोगांच्या...

आत्महत्या एक दुर्लक्षीत जीवघेणी समस्या

इमेज
                 सध्या कोणतीही वर्तमानपत्रे चाळली असता त्यामध्ये आत्महत्येचा बातम्या दिसतातच . एखादे वर्तमानपत्र जर रोज डोळ्याखालून घातले तरी त्या वर्तमानपत्रात आलेल्या दिसतात . आणि या आत्महत्या करणाऱ्या लोकांचा वयोगट जर बघितला तर त्याचा वयोगट प्रामुख्याने  तिशीच्या आतबाहेर असल्याचे आपणास सहजतेने दिसते . खरेतर हे वय काही करून दाखवण्याचे मात्र या वयात हि माणसे आपली जीवनयात्रा संपवतात . मात्र एखाद्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रचंड खाल करणारी आपली पारंपरिक माध्यमे ज्या प्रमाणात  प्रकाश टाकायला हवा  त्या प्रमाणात प्रकाश टाकत नाहीत . असे माझे निरीक्षण आहे .(माझे निरीक्षण परिपूर्ण आहे अशा माझा मुळीच दावा नाहीये ) त्यामुळे या नवमाध्यमाद्वारे त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन             तर मित्रानो अकबर आणि बिरबलाची माकडिणीचीगोष्ट आपल्याला माहिती असेलच एकदा बिरबल अकबर फिरायला गेल्यावरत्यांना  एका मोकळ्या हौदात एक माकडीण आपल्या पिल्लासोबबत खेळताना दिसते,   हे  बघून ...

समान मानव माना त्यांना

इमेज
        कवीवर्य कुसुमाग्रजांची फटका या काव्यप्रकारातील एक सुप्रसिद्ध कविता आहे, "स्वातंत्र्य देवतेची विनवणी" नावाची. भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पुर्ण होवून सुद्धा समाजात असणाऱ्या दोषांबद्दल स्वातंत्र्यदेवता आपल्या भारतीयांना ते दोष दूर करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत आहे, असी कल्पना करुन दैनिक सकाळसाठी लिहलेली ही कविता खरोखरीच उत्तम आहे.(दुर्देवाने ही कविता प्रसिद्ध होवून 22 वर्षे होवून देखील परिस्थिती फारसी बदललेली नाही. किंबहूना " जातीभेद,जून्या गोष्टी सोडून नव्या गोष्टी आत्मसात करणे,  तसेच मराठी भाषेविषयची स्थिती" पुर्वीपेक्षा खालवलेली दिसते, )असो.          या कवितेत महिलांविषयी बोलताना कवीवर्य कुसुमाग्रज म्हणतात, "समान मानव माना स्त्रीला, देवी म्हणूनी भजू नका, दासी  म्हणूनी  पिटू नका". कवीवर्य कुसुमाग्रज यांनी महिलांविषयी व्यक्त केलेली ही अपेक्षा आपल्या समाजातील अनेक घटकांना देखील तंतोतंत लागू होते. आपल्या भारतातील दिव्यांग व्यक्ती समुह देखील या व्यक्तीपैंकीच एक . आपल्या समाजाचा दिव्यांग व्यक्तींविषयक दृष्टिकोन आता अ...

मन विष्णण करणारी आकडेवारी

इमेज
आपण समस्त भारतीय लोक या करोना काळात येणाऱ्या आगामी सणांच्या तयारीत मग्न असताना, गेल्या आठवड्यात एक मन विष्णण करणारी एक आकडेवारी समोर आली. ही आकडेवारी होती जगभरातील  उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांचा  विविध प्रकारे अभ्यास करून त्या आधारे देशांची क्रमवारी केल्यावर भारताला मिळणाऱ्या क्रमांकाबाबतची . आर्यलँड या देशातील मानवतेसाठी काम करणारी सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असणाऱ्या  कॅन्सल्ट वर्ल्ड वाईड  आणि  आणि जर्मनीतील महत्त्वाची स्वयंसेवी संस्था असणारी वेल्थ हंगर लाइफ   या दोन स्वयंसेवी संस्थांनी जगभरातील  देशांचा विविध प्रकारे अभ्यास करुन तयार केलेल्या आकडेवारीत भारताचा क्रमांक होता 94वा . या आकडेवारीत जितका क्रमांक कमी तितकी देशातील स्थिती उत्तम होय. यात दुर्देवाची गोष्ट म्हणजे हिंदी भाषेतील कित्येक वृत्तवाहिन्यांच्या मते पृथ्वीवरचा नरक असलेल्या पाकिस्तानची स्थिती भारतापेक्षा उत्तम असल्याचे या अहवालात नमुद  करण्यात आले आहे . सार्क देशातील अफगाणिस्तान या देशाचा अपवाद वगळता अन्य सर्व देश भारतापेक्षा सरस कामगिरी करत असल्याचे यावेळी दिसून...

5 वर्षानंतर .....

इमेज
             आजपासून बरोबर 5 वर्षांपूर्वी अर्थात 2015च्या  सप्टेंबर महिन्यातील 3 तारखेची सकाळ अत्यंत वादळी ठरली होती ऊत्तर आफ्रिकेतून  युरोपात  येणाऱ्या निर्वासितांच्या एका बोटीला झालेल्या अपघातात प्राणास मुकलेल्या  सुमारे तीन वर्ष वय असणाऱ्या एका मुलाचे कलेवर समुद्रातून वाहत ग्रीसच्या किनाऱ्यावर आले होते त्या वर्षीचा तो सर्वात चर्चित मुद्दा ठरला होता .त्यावेळेस या प्रश्नाची अत्यंत व्यापक प्रमाणात चर्चा देखील झाली होती . काही कृती कार्यक्रम देखील त्यावेळी ठरला होता . दुर्दैवाने त्या वेळी ठरवलेल्या पैकी काहीच झाले नाही , याची साक्ष देणारी घटना दोन ते तीन दिवसापूर्वी ग्रीसमध्येच घडली . निर्वासितांच्या युरोपातील सर्वात  मोठ्या शिबिरामध्ये अर्थात मारिया बेटावरील शिबिरामध्ये लागलेल्या आगीमध्ये त्यांची अक्षरशः दणादण उडाली . आपल्या भारतीय वृत्तवाहिन्यांवर याविषयी या बातमीची दखल  घेण्यात आली नाही मात्र परदेशी  वृत्तवाहिन्यांनी याची यथोचित दखल घेतली . माझे आजचे लेखन या समस्येवर        ...

जेव्हा एका घटनादुरुस्तीमुळे दुसरी घटना दुरुस्ती झोकोळली जाते तेव्हा ........

इमेज
                           सध्या समस्त भारत नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे घुसमुळून जात असताना संसदेमध्ये इतर अनेक विधेयके सुद्धा मंजूर करण्यात आली आहेत . जी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे . मात्र त्याविषयी भारतीय माध्यमांमध्ये फारशी  चर्चा झालेली नाही . माझे आजचे लेखन त्या घटनादुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी आहे . मला  ज्या घटनादुरुस्तीकडे आपणाचे लक्ष वेधायचे आहे . त्यामुळे लोकसभेतील आणि काही राज्याच्या विधानसभेतील  सदस्य संख्येत बदल झाला आहे .  तर समस्त भारत CAA  वरील चर्चेत दंग असताना आपल्या संसदेत 126 व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली . ज्या अन्वये भारतीय संविधानाच्या कलम 331,  333 आणि कलम  362 च्या उपकलम 2  या कलामामध्ये बदल करण्यात आले.  कलम 331नुसार लोकसभेमध्ये अँग्लोइंडियन समाजाला 2 सदस्यांचे  प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती.  तर कलम 333नुसार राज्य विधानसभेत अँग्लो इंडियन  समाजाला 1सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे . या दोन्ही ठि...

आपण कधी बघणार या प्रश्नांकडे

इमेज
काल दिनांक 14जुलैला टिव्हीवर बिबिसी न्युज बघताना एक माहितीपट बघीतला . माहितीपट भारतातील तृतीयपंथीयांच्या समस्येवर आधारित होता . त्यामध्ये काय सांगितले होते त्याचा उहापोह मी येथे करणार नाही . मला लक्ष वेधून घेयचे आहे . त्यांनी मांडलेल्या विषयावर . बीबीसी प्रमाणेच  आखाती देशातील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या अल् जझीरा  या वृत्तवाहिनीवर मी भारतातील विविध समस्यांचे माहितीपट अनेकदा बघतो . (यावर कोणला  त्यांचा भारतविरोधी धोरणाचा वास येईल) चॅनेल न्यूज  एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीवर सुद्धा  भारतातील झटपट सुरु होऊन लवकरच बंद पडणाऱ्या स्टार्टअपविषयी एक माहितीपट मी बघितला होता . मात्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर मी या प्रकारचे माहितीपट कधीच बघितले नाही . भारतातील सर्व समस्या संपल्या आहेत , असेच काहीसे वार्तांकन भारतीय माध्यमांचे असते .ज्या समस्या अन्य परदेशी माध्यमांना सहजतेने दिसतात . त्या समस्या भारतीय माध्यमांना  का  दिसत नाही                भारतातील वृत्तवाहिन्या मनोरंजनाच्या बातम्या अध...

व्यथा त्यांचा

इमेज
              आज मी तुमच्याशी या ब्लॉगच्या माध्यमातून संवाद साधत असताना युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशात स्थलांतलाराविषयी मोठे वादळ  उठलय . अमेरिकेने मेक्सिको या देशाच्या मार्फ़त अमेरिकेत येणाऱ्या मध्य अमेरिका खंडातील लोकांविषयी कडक भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारलाय . मेक्सिको देशाबरोबर असणाऱ्या आपल्या सीमेवर मोठे कुंपण उभारले होते आणि  काल रविवारी मेक्सिको देशाबरोबर असणाऱ्या आपल्या सीमावर्ती प्रदेशात पोलीस तैनात केले होते . आज मेक्सिको देशातच त्यांना येण्यासाठी प्रवेश नाकालाय .सध्या जगभरात निर्वासितांचा मोठा प्रश्न आहे          दोन वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिकी खंडातील  देशातून येणाऱ्या स्थलांतरित लोकांचा मोठा प्रश्न गाजला होता . किंबहुना या स्थलांतरितांचा समूहातील एका छोट्या मुलाचा किनाऱ्यावर आलेला मृतदेह त्या वर्षीचा सर्वाधिक  चर्चिला गेलेला विषय होता . भारताच्या शेजारील देश असणाऱ्या बांगलादेश आणि म्यानमार यांच्यात वादाचा विषय असणाऱ्या रोहिंग्यांचा विषय सुद्धा या स्थलांतरांचाच विषय आह...