पोस्ट्स

मार्च ३०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यूपीएससी बदलाच्या वाटेवर , एमपीएससीत कधी होणार बदल ?

इमेज
       लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या प्रशासनाची आपल्या भारतात अत्यंत मजबूत व्यवस्था आहे किंबहुना अशी व्यवस्था असे हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट समजले जाते देशातील हा प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय स्तरावरची  यंत्रणा कार्यरत आहे जिला आपण युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या संक्षिप्त नावाने ओळखतो .उपजिल्हाधिकारी आणि त्यासारखी प्रशासनातील पदांवर कोणी काम करायचे यासासाठी देशभरात त्या त्या  राज्याचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत या  स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनपैकी एक म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन .जी एमपीएस्सी  या नावाने प्रसिद्ध आहे          हे सांगायचे कारण की . देशपातळीवर अधिकारी निवडणाऱ्या  यूपीएससीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत.  सरकारचे कार्य सुरळीत होण्यासाठी   खासदारांच्या अनेक समित्या कार्यरत असतात . या समित्या अभ्यासपूर्ण अहवाल सरकारला देत असतात . या अहवालात सांगितलेल्या सूचनेचा सरकारला ध्येय धोरणे ठरवताना अत्यंत उपयोग होतो .या समि