पोस्ट्स

मार्च २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक राजकारणातील महत्त्वाचा देश भारत

इमेज
         येणारा काळ हा भारताचा असेल असे  म्हटल्यास वावगे ठरू नये अश्या घडामोडी सध्या  घडत असलेल्या भारताच्या संदर्भातील  परराष्ट्रीय  घडामोडी बघितल्यास सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपानचे पंतप्रधान दोन दिवशीय भारत दौऱयावर आले   . चीनचे परराष्ट्र मंत्री देखील त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांनी भारताला भेट दिली . ऑस्टेलिया या देशाच्या पंतप्रधानांनी ऑनलाईन परिषदेत उपस्थित राहताना भारताला अनुकूल असे अनेक करार केले . तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या तीन दिवसाच्या दौऱयावर येणार आहेत हे कमी काय म्हणून इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या दौऱयावर असताना नेपाळचे पंतप्रधान देऊबा देखील यावेळी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱयावर असणार आहेत  नेपाळचे पंतप्रधान १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान भारताच्या भेटीवर असतील याच दरम्यान २६ मार्च ते ३० मार्च या दरम्यान मालदीव आणि श्रीलंका देशाच्या परराष्ट्र खात्याच्या आमांत्रणवरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीव या देशाच्या दोन दिवशीय आणि श्रीलंकेच्या तीन दिवशीय दौऱयावर गेले आहेत भारताच्या परराष्ट्र ध