पोस्ट्स

सप्टेंबर ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानात घडतंय तरी काय ?

इमेज
              पाकिस्तानात घडतंय  तरी काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहे .  एकीकडे देशात महापुराचे थैमान सुरु असताना त्याचवेळी पाकिस्तानातील केंद्रीय विधिमंडळाच्या राजकारणाने अत्यंत वेग पकडला आहे . देशाच्या एक १/३ भाग पुराच्या पाण्याखाली असताना उरलेल्या २/३ देशात प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांमार्फत अर्थात इम्रान खान यांच्यातर्फे मोठ्या राजकीय सभा आयोजित करण्यात येत आहे फैसलाबाद , गुजरानवाला , गुजराथ , सरगोडा, पेशावर  आदी पंजाब आणि खैबर ए पखवतुंवा ( पूर्वीचे नाव वायव्य सरहद प्रांत ) प्रांतातील शहरात या सभा होत आहे अल जझीरा , चॅनेल न्यूज एशिया  आदी विविध न्यूजचॅनेलवर या  राजकीय सभेचे जे व्हिडीओ दाखवण्यात येत आहेत त्यानुसार या सभांना हजारोने नाही तर लाखांच्या संख्यने लोक गर्दी करत आहेत.  . भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या वेळी आपल्या भारतात कोणी राजकारणी आपली सभा घेणार नाही मात्र ४ सप्टेंबर २०२२ रोजी भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेसच इम्रान खान यांनी फैसलाबाद या शहरात राजकीय सभा घेतली. अल जझीरा ने दिलेल्या बातमीनुसार या सभेला एक लाखाहून थोडेसे अधिक लो