पोस्ट्स

फेब्रुवारी १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली गोदावरी वाचावा ...

इमेज
              नाशिकचे भूषण असणारी  गोदावरी नदी  वाचवण्याची गरज असल्याचे बुधवार १६ फेब्रुवारी रोजी हरित लवादाने दिलेल्या निकालामुळे  पुन्हा एकदा स्पष्ट झाले आपल्या निवाड्यात हरित लवादाने गोदावरीचे पाणी पिण्यास आणि अंघोळ करण्यास लायक नसल्याचे स्पष्ट केले आहे नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पंच्या दर्जा ढासळत असल्याचे निरीक्षण हरित लवादाने आपल्या निकालात  नोंदवले आहे  राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल आणि न्या. सुधीर अग्रवाल यांच्या खंडपीठाने या बाबत भाष्य करताना सांगितले की नाशिक आणि त्रंबकेश्वर या शहरात  दरदिवशी ४५ ते ५० लाख लिटर सांडपाणी तयार होते. मात्र, केवळ १० लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित ३५ ते ४० लाख लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीमध्ये सोडले जाते.जे अत्यंत चिंताजनक  असून या सांडपाण्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यास सोडा अंघोळीस देखील लायक नाही मात्र तरी देखील लोक ते वापरत आहेत जे वाईट आहे या निकालात राष्ट्रीय हरित लवादाने राज्य आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दात नापसंती दर्शवली प्रशासनामार्फत सर्वोच्च न्य्यायालयाक