27 वर्षापूर्वीची ती काळरात्र
दिनांक 1सप्टेंबर 2020 रोजी अनंत चतूर्दशी आहे, हे आपण जाणतातच. या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील यात्रा संपवून परत कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 27 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे . मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 27वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली. लातूर किल्लारी परीसराला ला...