पोस्ट्स

मार्च ४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे असणारा जिल्हा ........ जळगाव

इमेज
          आपण अनेकदा एखाद्या गोष्टीला एखाद्या विशिष्ट चष्म्यातूनच बघतो .  त्या गोष्टीला इतर अनेक पैलू  असू शकतात हे आपल्या गावीही नसते . उदाहरणार्थ जळगावला गेल्यावर पर्यटन स्थळे बघायची असल्यास जा अजिंठा वेरूळला वगैरे . मात्र जळगावला गेल्यावर अजिंठा आणि वेरूळ सोडून अनेक बघण्यासारखी स्थळे आहेत जसे साडेतीन गणपतींपैकी एक पूर्ण पूर्ण गणपतीचे स्थान असणारे पद्मालय, ( पुणे परिसरात असणाऱ्या अष्टविनायकांखेरीज महाराष्ट्रात गणपतींची साडेअकरा स्थाने आहेत.  ज्यामध्ये नागपूर परिसरात असणाऱ्या 8 गणपतीचा तसेच या साडेतीन गणपतींचा समावेश होतो ), तसेच उनपदेव आणि मनुदेवी या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणासह अमळनेर येथील भारतातील मोजक्या ठिकाणी असणाऱ्या मंगळाचे  मंदिर वगैरे . मी नुकतीच यातील अमळनेर येथील मंगळाच्या मंदिराखेरीज अन्य तीन ठिकाणी भेट दिली . त्या प्रसंगी मला जाणवलेले तेथील स्थानमहत्व तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन.           मी नेहमीप्रमाणे माझ्या प्रवासाची  सुरवात केली ती  शनिवारी रात्री . मी नेहमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतो.  मात्र  नाशिकहून जळगावासाठी  शेवट