पोस्ट्स

जून ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असा राजा न होणे !

इमेज
 छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच गर्वाने छाती फुलून न येणारा एखादाच कोणी महाराष्ट्रीयन असेल.तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली .त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात. मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी  महाराजांनी . राजांचे कार्य  येव्हढ्यावरच थांबत नाही, त्यांनी स्थानिक जनतेची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असावी . यासाठी देखील प्रयत्न केले . त्यासाठी स्वतंत्र्य राज्यकारभार कोष देखील त्यांनी तयार केला . आजदेखील आपण स्थानिक न्यायालयांचा कारभार बहुतांश वेळा इंग्रजी भाषेतून करतो, तो जेव्हा स्थानिकांना समजेल अस्या मराठी भाषेत येईल ,तेव्हाच महाराजांंचे  रयतेच्या राज्याचे स्वप्न  प्रत्यक्षात साकार होईल, असे मला वाटते.महाराज्यांचा काळात सध्या ज्या प्रमाणे इंग्रजी भाषेतील शद्ब मराठीत रुढ होत आहे , त्याप्रमाणे अनेक फारशी शद्ब रुढ होते . मह