पोस्ट्स

ऑक्टोबर २९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इयूच्या गळ्यात अडकलेले हाड ब्रेक्सिट (भाग ४ )

इमेज
                                 या दिवाळीच्या दिवसात समस्त महाराष्ट्र पाऊस कधी जाणार? , महाराष्ट्राचा  मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ कधी घेतो , याकडे डोळे लावून बसलेली असताना , भारताच्या सर्वाधिक आंतराष्ट्रीय व्यापार ज्या युरोपीय युनियनशी होतो , त्या युरोपीय युनियन मध्ये वेगळीच चिंता घोर लावत आहे , ती म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारे ब्रेक्सिट कधी होणार ? बेक्सिट विषयीचा या ब्लॉगवर हा  चवथा लेख लिहीत असताना ( या आधीच्या तिन्ही लेखाची लिंक या लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे. )  युरोपीय युनियनने ब्रेक्सिटसाठी युनाटेड किंग्डमच्या संसदेला ३ महिन्याची मुदतवाढ दिली आहे . आता ब्रेक्सिटसाठी  ३१ जानेवारी २०२०ही मुदत असेल . त्याच्या अगोदर युनाटेड किंग्डम मध्ये १२ डिसेंबर त्यांच्या संसदेसाठी निवडणुका होतील, असे हा लेख लिहण्यापर्यंत पंतप्रधान असलेले बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केले आहे . मात्र या निवडणूक याच्या आधी हव्यात अशी तेथील विरोधी पक्षाची भूमिका आहे . अर्थात या मागे जर निवडणूक उशिरा झाल्यास संसद भंग होऊन सुद्धा कार्यरत असणारे हंगामी मंत्रिमंडळ ब्रेक्सिटबाबत निर्णय घेण्याची भीती