पोस्ट्स

डिसेंबर १२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झूक झूक अगीन गाडी

इमेज
      आपल्या भारतीय रेल्वेत सध्या देशभर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत, हे आपणास माहिती असेलच.रेल्वेबाबत महाराष्ट्राला कायम सापत्नतेची वागणूक  दिली जात असल्याचे वारंवार सांगितले जाते . मात्र हे खोटे असल्याचे महाराष्ट्रात रेल्वेचे सुरु असणारे प्रकल्प बघताना आपणास दिसते. या प्रकल्पाचे आपण दोन प्रमुख प्रकारे विभाजन करु शकतो. ते म्हणजे 1)पुर्णतः नविन मार्गाची निर्मिती 2)जून्या मार्गात सुधारणा . जून्या मार्गात सुधारणा या प्रकारचे सुद्धा दोन प्रकारे विभाजन करता येते 1) नविन रुळ टाकणे 2) मार्गाचे विद्यूतीकरण करणे . पहिल्यांदा जून्या मार्गावर नविन रूळ टाकण्याबाबत बोलूया . मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात अस्तिवात असणाऱ्या काही रेल्वे मार्गाचे नुकतेच दुपदीकरण करण्यात आले अथवा या कार्यासाठी पुरेसी निधीची तरतूद करण्यात आली. म्हणजेच पुर्वी तिथे एकच रेल्वेमार्ग होता, एकाच मार्गावरुन अप आणि डाउन दोन्ही प्रकारच्या गाड्या धावत असे आता मात्र या मार्गावर अप आणि डाउनसाठी वेगवेगळे रुळ असतील अस्या  मार्गात पुढील मार्ग येतात. 1)पुणे- मिरज -लोढा या 462 किमीच्या रेल्वेमार्गासाठी 4795 कोटी रुपये मंजूर करण्य

जरा याद करो उनको

इमेज
     दिनांक 13 डिसेंबर 2001..., स्थळ संसदेची इमारत नवी दिल्ली......., वेळ सकाळी अकराची....., संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने देशातील सर्व खासदार संसदेच्या प्रांगणात हजर.ज्यामध्ये सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी, पि सी चिदबरन् आदी देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे खासदारांचा समावेश असतो....... नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु असते. आज काही वेगळ घडणार आहे. याची पुसटशी देखील शंका तेथील सुरक्षा रक्षकांना नव्हती. अचानक खासदारांसाठी असलेले स्टिकर लावलेली एक कार संसदेच्या आवारात घूसते. नेहमीच्या ठिकाणी न थांबता सरळ संसदेच्या आवारात घूसते. खासदाराची गाडी आहे. कशाला तपासायचे? असा विचार करुन सुरक्षा रक्षक  त्या गाडीला तसेच पुढे जावू देतात. जी सुरक्षा रक्षकांची चूक असल्याचे नंतर लक्षात येते , कारण ही गाडी संसदेच्या इमारतीला खेटून उभी राहते. त्या कारमधून आलेल्या व्यक्ती गोळीबार करत  संसदेच्या मुख्य सभागृहाच्या दिशेने पळायला सुरवात करतात.  आणि एकच हल्लाबोळ होतो.मग समजते की काश्मीरी दहशतवाद्यांनी भारताच्या सार्वभौम संसदेवर हल्ला केला आहे.  आज 2020 साली या घटनेला 19 वर्षे पुर्ण झाली आहे