पोस्ट्स

ऑक्टोबर २९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कहाणी भुगर्भाच्या 2शोधांची

इमेज
                         सध्या समस्त भारतीयांचे लक्ष बिहार निवडणूक, आणि महाराष्ट्राचे लक्ष विविध छोट्यामोठ्या मुद्द्यांकडे लागलेले असताना भारताचा भुगोलाच्या दृष्टीने 2 महत्त्वाच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यातील एक गोष्ट  सकारात्मक आहे, तर दुसरीला नकारात्मक छटा आहे. या दोन घटना राजस्थान आणि लडाख या क्षेत्रात उघडकीस आल्या आहेत . आपल्या मराठीतील मुख्य धारेच्या माध्यमांनी याकडे काहीसे दुर्लक्ष केल्याने समर्थांच्या "जे जे आपणासी ठाव, ते ते सकलासी सांगावे सकल जना " या वचनानुसार आपणापर्यत सदर माहिती पोहचवण्यासाठी आजचे लेखन                   तर सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणाऱ्या पश्चिम राजस्थानात 1 लाख 72 हजार वर्षापुर्वी एक मोठी बारमाही पाणी असणारी नदी वहात असल्याचे स्पष्ट पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. राजस्थान च्या बाडनेर , जैसलमेर या जिल्ह्यातून सदर नदी वहात होती . या नदीचा जो मार्ग भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटतो, त्या मार्गापासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटरवरुन सध्या नद्या वहात आहेत. ही नदी सरस्वती नदीपेक्षा वेगळी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सरस्वती नदी 30 हज