पोस्ट्स

सप्टेंबर ५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की झाले अजून गहन ?

इमेज
आपल्या भोवताली असणाऱ्या अथांग अश्या विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की अजून गहन झाले ? असा प्रश्न पडावा अस्या घडामोडी नुकत्याच खगोलशास्त्रात घडल्या . त्याविषयी आपल्याकडे इंडियन एक्सप्रेस सारख्या काही इंग्रजी वृत्तपत्रे सोडून अन्य माध्यमांनी फारशी दखल घेतलेली नाही . आपल्याकडे इंग्रजी भाषेतील माध्यमांपेक्षा  प्रादेशिक भाषेत माहिती देणाऱ्या माध्यमांना  काहीसे अधिक महत्व असल्याने मराठी या प्रादेशिक भाषेत तो शोध सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखाच्या शेवटी मूळ इंडियन एक्सप्रेस या  वृत्रपत्रातील लेखाची लिंक दिली आहे . ज्यांना या शोधाची मुळातून माहिती हवी आहे, अश्या व्यक्ती त्या  लिंकवर क्लिक करून मुळातून लेख वाचू शकतात     तर .मित्रानो , आपल्या पृथ्वीपासून  17 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या  एका ठिकाणहून दोन कृष्णविवर एकत्र आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे . शास्त्रज्ञांनी या जागेला  GW190521  असे नाव दिले आहे  आपण जी घटना आता बघतो आहोत ती घटना 17 अब्जवर्षांपूर्वी घडून गेली आहे . त्या वेळी निर्माण झालेल्या  गुरुत्त्वीय लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत आता आपल्या पर्यंत पोहोचल्या आहेत विश्वाचे