पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी पाउल पडते कुठे ?

कोणतीही गोष्ट जर वापरात नसेल तर कालांतराने ती गोष्ट बंद नष्ट होते ,अथवा बंद होते . पुर्वी मानवास शेपटी होती तिचा वापर न केल्याने ती झडुन गेली आणि त्याची निशाणी म्हणून निव्वळ माकडहाड राहिले . पोस्टाची एके काळची महत्वाची सेवा असलेल्या तारसेवेचा उपयोग कमी कमी होत गेला . परिणामी टपाल खात्याने तिलाच रामराम ठोकला . या पुर्वी जगात अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत . त्यात अजून एका गोष्टीची भर पडणार का ? अशा प्रश्न आज मला एटिम मधून पैसे काढताना पडला त्यासाठीच आजचा हा पञप्रसंग त्याचे असे झाले की काहि कारणा निमित्याने पैसै काढण्यासाठी एटीम मध्ये गेलो असता मी कार्ड मशिनमध्ये घातल्यावर  भाषा म्हणून मराठि निवडली खरी माञ पुढे काहिच कार्यवाहि होइना त्या मशिनमध्ये फक्त दाखवायला मराठी भाषेचा पर्याय दिला होता माञ त्याचा पुढिल संगणकिय प्रोग्रामच लिहला नव्हता . कारण काय असेल त्याचे ? वापरणारेच नाहीत तर कशाला उगिच लिहायचा . हेच असणार ना त्या मागचे कारण . म्हणजेच त्या मशिन पुरती मराठी बंद , वापरा हिंदी अथवा इंग्रजी  . आपल्या मराठीत एक म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे . याचा अर्थ थोड थोड करतं गेल्यास खुप मोठ्या प