पोस्ट्स

ऑगस्ट १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यावरणपुरक गणपती उत्सव

इमेज
   निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत नाही  नदीपात्राचा विचार करता या शाडूच्