पोस्ट्स

एप्रिल १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोस्त दोस्त ना राहा

इमेज
       सन १९६४ साली संगम नावाचा एक चित्रपट येऊन गेला त्यामध्ये मुकेश यांनी एक गायलेलं एक आहे "दोस्त दोस्त ना रहा " असे . सध्याची अमेरिकेची अवस्था अशीच झाली आहे दोस्त दोस्त ना रहा . अमेरिकेच्या मैत्री यादीतील कमी झालेला देश म्हणजे ,आखाती देशातील महत्त्वाचा देश जो इस्लामी देशांचे नेतृत्व करतो जो जगातील पहिल्या क्रमांकाचे तेल उप्तादन करतो जो देश तेथील कडक शिक्षेमुळे ओळखला जातो जो आतापर्यन्त महिलांना अत्यंत कमी स्वातंत्र्य देणारा देश म्हणून ओळखला जात असे  तो देश म्हणजे सौदी अरेबिया .        जगभरात मानवी हक्काच्या बाबतीत इतर देशांना कायम आरोपीच्या पिजऱ्यात उभा करणारा देश म्हणजे अमेरिका . मानवी हक्क रक्षणाचा जगातील मक्ता केवळ आपणस मिळालेला आहे जगभरात जिथे कुठे मानवी हक्काची पायमल्ली होते तिथे न्यायनिवाड्याचा हक्क केवळ आपणास आहे अश्या तोऱ्यात विविध देशांवर विनाकारण हल्ला करून त्या देशांची राख रांगोळी करणारा देश म्हणजे अमेरिका . जगभरात कायम लोकशाहीच्या बाबतीत गळा काढणारा देश म्हणजे अमेरिका स्वतःला धर्मनिरपेक्षतेचा आदर्श समजणारा देश म्हणजे अमेरिका . स्वातंत्र्याची परिसीमा समजणारा  दे