पोस्ट्स

जुलै १४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चंद्रयान 3 भारतीयांची अभिनंदनस्पद कामगिरी

इमेज
  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने 14 जुलैला देशाच्या प्रगतीत एका अभिनंदनस्पद कामगिरीची नोंद केली, हे एव्हाना आपल्याला माहिती झालेच असेल . सुमारे तीन वर्ष अथक प्रयत्न करत जगातील 210 देशांपैकी अत्यंत मोजक्या एका हाताची पाच बोटे सुद्धा त्यांची यादी करायला जास्त होतील, अशी कामगिरी अर्थात चंद्रावर यान पोहोचवण्याची भीम कामगिरी भारताने पुन्हा एकदा पार पाडली .  ज्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेची सुरवात,  दिवाळीत आपण उडवतो त्या प्रकारची, मात्र दिवाळीतील रॉकेटच्या पेक्षा मोठी रॉकेट उडवत, एका पडक्या चर्चमध्ये झाली.  रॉकेटचे विविध भाग शास्त्रज्ञानी सायकलवर एखादी मोळी बांधून वाहतूक करावी, त्या पद्धतीने वाहून आणले, या पद्धतीने झाली. त्या संस्थेने अमेरिका रशिया आदि विकसित देशच्या तुलनेत अत्यंत किरकोळ खर्च्यात चंद्राला गवसणी घालावी हे नवलच . ते देखील स्पेस वॉर सारख्या एखाद्या हॉलिवूडमधील चित्रपटाची निर्मितीसाठी लागलेल्या रककमेपेक्षा कमी खर्चात, चंद्रमोहिमेची आखणी करण्यात आली आहे, ही बाब आपण कायमच लक्षात घेयला हवी .        अन्य देशांच्या चंद्रमोहिमेत न आढलेलेली, चंद्रावर पाणी असण्याची गोष्ट देखील,