पोस्ट्स

सप्टेंबर २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ

इमेज
         पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .              सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत                   जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .21मार्चनंतर सूर्य कर्कवृताकडे भ्रमण करतो सूर्य कार्कवृतावर २२जूनला असतो त्यानंतर तो दक्षिणेकडे प्रवास करायला