बातमीतील श्रीलंका
श्रीलंका आपल्या भारताच्या दक्षीणेला असणारे एक बेट स्वरुप राष्ट्र , जे भारत स्वतंत्र झाल्यावर एका वर्षाने स्वतंत्र्य झाले. आपल्या रामायण या महाकाव्यात उल्लेख असणारे राष्ट्र , नैसर्गिस सृष्टीसौंदर्याने भरभरून राहिलेले राष्ट्र म्हणजे श्रीलंका . तर हा श्रीलंका हा देश गेल्या पंधरवाड्यात तीनदा विविध कारणांमुळे चर्चेत आला. पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशाने श्रीलंका या देशाला दिलेले साँफ्ट लोन , दिसरी घडामोडी म्हणजे श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला झालेला अपघात आणि त्यामुळे श्रीलंकेच्या पर्यावरणावर झालेला अनिष्ट परीणाम . तर तिसरी घटना म्हणजे श्रीलंकेने स्पेशल इकाँनाँमिकल झोन उभारताना चीनला दिलेल्या अवास्तव परवानग्या . आता बघूया या सर्व घडामोडी क्रमाक्रमाने प्रथम बांगलादेशाने श्रीलंकेला दिलेले साँफ्ट लोन. श्रीलंकेकडे आजमितीस फक्त 4 दशलक्ष इतकेच परकीय चलन आहे. मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापार करण्यासाठी अधिक परकीय गंजाजळीची आवश्यकता आहे. ती पुर्ण करण्यासाठी बांगलादेश श्रीलंकेला 200 दशलक्ष डाँलरची मदत करणार आ...