पोस्ट्स

जानेवारी १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर मराठवावाडा रेल्वेच्या विकासाच्या नकाश्यावर

इमेज
                  मराठवाडा देशाच्या साधारण मध्यभागी असणारा एक अविकसीत मात्र धार्मिक विचार करता अत्यंत समृद्ध भाग.(देशभरात असणाऱ्या 12पैकी ज्योर्तिलिंगापैकी 3 ज्योर्तिलिंग आणि देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी दोन पुर्ण शक्तीपीठ  तसेच  महाराष्ट्रातील संतांपैकी अनेकाचा काहीना सबंध हा मराठवाड्याशी असतोच) हे मराठवाड्याचे अविकसीत अनेक बाबतीत दिसते ,राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेची स्थिती वगैरे  आता मात्र या चित्रात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. संपुर्णतः डिझेलवर चालणाऱ्या मराठवाड्याचा रेल्वेचे आता झपाट्याने विद्यूतीकरण होत आहे. परभणी ते परळी वैजनाथ ते विकाराबाद, मनमाड ते औरंगाबाद, कुर्दुवाडी ते लातूर तसेच अकोला ते पुर्णा या सर्वच मार्गावर रेल्वे झपाट्याने विद्यूतीकरण करताना आपणास दिसत आहे       परभणी जंक्शन  ते परळी वैजनाथ या सुमारे 64 किमीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम मागील वर्षी अर्थात 2021 साली सुरु झाले. आजमितीस त्यातील 31किमीचे म्हणजेच सुमारे 50% काम पुर्ण झाले आहे. पोखरणी ते वडगाव निळा या दरम्यान काम अत्यंत वेगाने सुरु आहे.या दरम्यान विद्युतीकरणासाठी आवश्यक असणारे खांब उभारण्याचे

जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते.

इमेज
            सध्या नाशिककर कोव्हिड 19 च्या वाढत्या संख्येमुळे धास्तावले असताना,  एक नाशिककर जगभरात नाशिकचेच नव्हे, भारताचे नाव उंचावत आहे. सुपर ग्रँडमास्टर विदीत गुजराथी हे त्या नाशिककराचे नाव.De  Moriaan येथे सुरू असणाऱ्या टाटा स्टिल चेस चँम्पियन स्पर्धेत  तिसऱ्या डावा अखेर अडीच गुण प्राप्त करत स्पर्धेत अभिनंदनास्पद बढत घेतली आहे. त्यांनी पहिल्या आणि तिसऱ्या डावात विजय तर दुसऱ्या  बरोबरी साधली.  टाटा स्टिल चेस चँम्पियन चे 84 वे वर्ष आहे. ही स्पर्धा फिडे या बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून दरवर्षी आयोजित करण्यात येते. टाटा स्टिल या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आहेत. त्यामुळे त्यांचा नावे ही स्पर्धा ओळखली जाते.  जसे व्हिवो आयपिएल,डिएलएफ आयपिएल वगैरे.        बुद्धिबळाच्या कॅलेंडरमधील वर्षातील सर्वात  महत्वाची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते.बुद्धिबळाच्या स्पर्धा तीन प्रकारात होतात ,क्लासिकल, रँपिड आणि ब्लिटस .त्यातील क्लासिकल या प्रकारात 13 फेऱ्यामध्ये होणारी ही स्पर्धा अत्यंत महत्ताची आहे.टाटा स्टिल चेस चँम्पियन  ही स्पर्धा बुद्धिबळातील विंब्लडन म्हणून ओळखली जाते. बुद्धीबळची क्ल