पोस्ट्स

ललीत लेखन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जगातील प्रत्येकाची इच्छा उघड करणारे गाणे

इमेज
जगात एक गोष्ट सोडून सर्व गोष्टींना शेवट आहे.ज्या एकमात्र गोष्टीला अंत नाही, ती गोष्ट म्हणजे मानवी इच्छा. ज्याने या इच्छेवर नियंत्रण मिळवले, त्याने जग जिंकल्यातच जमा आहे,असे आपण सातत्याने ऐकतो वाचतो.या इच्छा वेगवेगळ्या असतात.कोणत्याही दोन व्यक्तींचा इच्छा सारखे असणे कधीच शक्य नाही.कोणाला पैसा हवा असेल कोणाला समाजातील आपले स्थान उंचावण्याची इच्छा असेल. जसे इच्छेला अंत नाही तसेच या इच्छेच्या प्रकाराचा  शेवट नक्की कुठे होतो हे सांगणे देखील तितकेच अवघड आहे,असे देखील आपण ऐकतो वाचतो मात्र दोनच दिवसापुर्वी सहज विरंगुळ्यासाठी युट्युब वरील व्हिडीओ बघत असताना एक व्हिडीओ सजेशनमध्ये दिसला आणि इच्छेला आणि इच्छेच्या प्रकाराला देखील मोजता येईल अशी मर्यादा असल्याची जाणिव झाली.माझ्या वाचक मित्र-मैत्रीणींनो तो व्हिडीओ होता एका गाण्याचा. आज २०२६ साली जे गाणे रिलीज होऊन सुमारे १६+ वर्ष होऊन गेली आहेत अस्या त्या गाण्यात मला इच्छेचा अंत दिसला. ते गाणे होते, एकेकाळी अंगी असलेल्या कलेच्याऐवजी शरीरयष्टी आणि नागरिकत्वाच्या तसेच धर्माचा कारणामुळे विनाकारण चर्चेत आलेल्या अदनान सामी याचे 'मुझको तो लिफ्ट करा दे,...

आपल्या देवाविषयीच्या संकल्पना विस्तारणारे गाणे,

इमेज
  दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर मराठीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या देऊळबंद २ या चित्रपटावर चर्चा सुरु होती.चर्च करता करता गाडी याच चित्रपटाच्या नावाशी सारखेपणा असलेल्या देऊळ या चित्रापाशी येऊन थांबली .चर्चा भुरकट आहे हे लक्षात अळ्यांचे ऍडमिनने चर्चा लगेच थांबवली .मात्र त्यावेळी माझ्या मनात सुरु असलेले विचार चक्र अजून सुरूच आहे .तसे बघायला गेले तर हा विषय आपणास काही नवीन नाही हिंदीतील गोष्टच सोडा आपल्या मराठीत देखील हा विषय कल्पकतेने मांडण्यात आला आहे . आपल्या मराठीच्या उत्तमोत्तम  गाण्याच्या खजिन्यातील एक असलेले 'देव  देव्हाऱ्यात नाही देव नाहोती देवालयी'  हे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील गाणे हे याचे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणता येईल  ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हे मराठी गाणे आपल्यास काय सांगते ? याचा एका ओळीचा सारांश  सांगायचं झाल्यास,  देव ही केवळ मूर्ती, मंदिर किंवा देव्हाऱ्यात मर्यादित असलेली संकल्पना नाही. उलट, देव हा प्रत्येक सजीवात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि माणसाच्या अंतःकरणात वास करतो. आपण अनेक...

मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा ..

इमेज
  मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा .. शीर्षक वाचून गडबडलात का ? आता हा काय सांगतोय मोबाईलला कोणी केले बळीचा बकरा .. मुळात मोबाईल हे एक यंत्र आहे तो काही सजीव प्राणी नाही त्यामुळे त्याला मुळातच बळीचा बकरा कसे केले जाऊ शकते असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर जरा थांबा आणि मी काय म्हणतोय (म्हणजे लिहितोय हो...! ) हे जरा समजून घ्या  तर वाचक मित्र मैत्रिणींनो आजची पिढी काही वाचतच नाही जेव्हा बघावे तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल आणि मोबाईल असे आपण अनेकदा ऐकतो वाचतो.  आजच्या पिढीच्या वाचायला न आवडण्याचे पाप सरळ मोबाईलवर ढकलून दिले जाते जसे काही मोबाइलमुळेच वाचन संपले म्हूणनच  म्हंटले मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा  मला मान्य आहे की, मोबाईलमुळे वाचन काहीसे कमीच झाले आहे.मात्र वाचन कमी होण्यामागचे तेच एक कारण नाहीये. आपण जर इतिहासात बघितले तर  कारणे काहीही असो  वाचन मुळातच कमीच होते, असे दिसते.  किंबहुना त्यामुळेच समर्थ रामदास स्वामींना,  ... प्रसंगी अखंडित वंचित जावे असा उपदेश करावा लागला. जरा विचार करा जर रामदास स्वामींच्या काळात वाचन म...

मानवी आयुष्यातील नात्यांचे महत्त्व उलगडणारा चित्रपट '“अमृत

इमेज
  आज २०२६ साली सुद्धा गावाच्या साधारणतः मध्यभागी असलेल्या महादेवाच्या मंदिराला केंद्र मानून एक दीड  किलोमीटरचे वर्तुळ काढले तर संपूर्ण गाव येऊ शकेल अश्या धार्मिक महत्त्व असलेल्या त्रंबकेश्वर या शहरातील एका ब्राह्मण कुटूंबियातील धोंडोपंत फाळके (दादासाहेब फाळके ) यांनी ११३ वर्षांपूर्वी भारतात आणलेले चित्रपट हे तंत्र मोठे विलक्षण आहे. मानवी आयुष्यतील रंजकता, दाहकता यांचे प्रभावीपणे सादर करणे. समाजाला उपयोगी पडेल असा संदेश समोरच्याला आपणास उपदेश केला आहे याची थेट जाणीव न होता समजेल अश्या पद्धतीने देण्यासह व्यक्तीचे मनोरंजन करण्यात चित्रपटाचा हात कोणी धरू शकणार नाही, असे मला वाटतंय.   संगीत नाटक, एकपात्री नाटक,  दोन अंकी नाटक, फिरता रंगमंच असलेले नाटक तमासातील वगनाट्य आणि यासारखे कोणतेही प्रकार घेतले तरी त्यास चित्रपटाची सर येणे निव्वळ  अशक्यच .  आपल्या भारताला अनेक उत्तोमत्तम आशयघन चित्रपटाची मोठी परंपरा आहे . याच अभिंनदनास्पद वाटचालीतील अनेक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे अमृत  “अमृत हा १९८६ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी आहे....

पती-पत्नीच्या विश्वासाची दृढता स्पष्टपणे दाखवून देणारे गाणे

इमेज
दोनच दिवसापुर्वीची गोष्ट आहे. एका वर्तमानपत्रात सध्या समाजात वाढणारे घटस्फोट, आणि त्यातून निर्माण होणारे एकल पालकत्व यावर परखड भाष्य करणारा लेख वाचायला मिळाला.पती-पत्नींचा संघर्षात त्याच्या अपत्यांचे होणाऱ्या मानसिक शोषणाबाबत लेख चिंता व्यक्त केली होती. मी फावल्या वेळात अनेकदा गाणी ऐकतो. त्यामुळे अनेकदा होत काय ? तर एखादी घटना बघितली एखादा लेख वाचला की, आपोआप अरे या प्रसंगाला हे गाणे याला शोभून दिसेल,असे लक्षात येते.याही वेळी अग्गदी तसेच झाले.या लेखाला मला एक गाणे आठवले ते म्हणजे, 'दिस येतील,दिस जातील भोग सरेल, सुख येईल',हे गाणे.१९८२ प्रदर्शित झालेल्या शापीत या चित्रपटातील हे गीत स्मिता पाटील आणि कुलदिप पवार यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गीताचे गायक आशा भोसले आणि सुरेश वाडकर आहे गीतकार सुधीर मोघे असून संगीतकार    सुधीर फडके आहेत कातकरी समाजाच्या कष्टकरी जिवनाच्या पार्श्वभुमीवर हे गाणे चित्रीत झालेले असले तरी, माझ्यामते हे गाणे कोणत्याही नवरा -बायकोच्या नात्यावर भाष्य करणारे गाणे म्हणून ओळखले जाऊ शकते. ज्यात पत्नी आपल्या पतीस सध्या जरी कष्ट्राचे दिवस असले तरी आपण ए...

समाजसेवा करु इच्छिणाऱ्या व्यक्तीने बघावाच असा चित्रपट ट्रॅफिक सिग्नल'

इमेज
  तरुण भारत,नागपूरच्या पुणे आवृत्तीत सध्या दर रविवारी एक सदर प्रसिद्ध होत आहे, पोरकं पोरे नावाच. विविध कारणांनी बालपणीच्या आनंदाला मुकलेली, बालपणा देगा देवा मुंगी साखरेचा मेवा, या वाक्यप्रचारात सांगितल्याप्रमाणे बालपणीचा मनमुराद आनंद न घेता, करपलेल्या अभागी आयूष्याला सामोरे जाणाऱ्या मुला- मुलींची माहिती या सदरात देण्यात येते‌.याच मालिकेत एक लेख होता, ट्रॅफिक सिग्नलवर आयुष्य व्यतित करणाऱ्या मुला-मुलींच्या आयुष्यातील मन पिळटावून सोडणाऱ्या आयुष्यावर.तसे हा विषय अनेक प्रकार चित्रपटातून दाखवण्यात आला आहे‌. स्लमडॉग मिलेनीयम या चित्रपटातील  मधील बराच मोठा भाग यांच्या आयुष्यावर भाष्य करतो. असो. मी एस.पी .कॉलेजमध्ये शिकत असताना मोठ्या प्रमाणात चित्रपट बघितले त्या अनुभवानुसार सांगतोय,ही समस्या जर कोणत्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडली असेल तर ती मधुर भांडारकर  दिग्दर्शित आणि निर्मित ' ट्रॅफिक सिग्नल या चित्रप मधुर भांडारकर दिग्दर्शित ट्रॅफिक सिग्नल हा चित्रपटात. तसेच मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट जेल, पेज थ्री, कार्पोरेट, मै माधूरी दिक्षीत बनना चाहतू हूं,  सामाजिक समस्...

समस्या सारखीच फक्त माध्यमात बदल

इमेज
कालच मला व्हाट्सअप वर एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आजची तरुण पिढी  झेन झी ही इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे कसे देशाचे वाटोळे होत आहे, यावर साधरणत:सत्तरीच्या वयाचे आजोबा चिंता करत होते. तो व्हिडीओ बघत असताना, मला का जाणे कुणास ठाउक, माझ्या नाशिकच्या कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवायला लागल्या. 'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी । करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥' कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'स्वातंत्र्य देवतीची विनवणी' या कवितेतील या ओळी व्हिडीओशी देखील मेळ खात होत्या. आजोबा तरुणाईच्या व्यसनाविषयी बोलत होते, आणि कवीवर्य कुसुमाग्रज देखील आजपासून २९ वर्षापुर्वी याच तरुणाईला वेळ वाया घालण्यापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्न करत होते.तशी ती संपूर्ण कविताच विचार करण्यासारखी आहे.गेल्या ३०वर्षात परिस्थिती किती सुधारली (किंबहुना बिघडली)याचा विचार करणारा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.मात्र तूर्तास आपण तो विषय बाजुला ठेवूया.असो तर कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या वेळच्या निरर्थक गोष्ट्रीत तरुणाईने वेळ वाया घालवू नये.तरुणाईने करमणूकीला कमी म...

मनोव्यथा राजहंसाची

इमेज
  काही दिवसापूर्वी मराठीतील एक सुप्रसिद्ध साहित्यकार गजानन दिंगबर माडगूळकर अर्थात ग . दि .मा यांच्या पुणे शहरातील बंगल्याविषयीच्या उलट सुलट बातम्या सोशल मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये ‘आपण वाचल्या असतीलच. मला त्या वादात पडायचे नाही.  गीत रामायण सारखी अवीट भक्तीने भरलेली रचना करणाऱ्या या साहित्यिकाच्या  गीत रामायण सोडून अनेक साहित्यकृती देखील  या अक्षरशः जीव ओवाळून टाकण्यासारख्याच आहे यातलीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे, ' एका तळ्यात होती,बदके पिल्ले सुरेख,होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक' इतरांच्या पेक्षा वेगळी प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रतिभेची समाजाकडून यथोचित दाखल घेतली न गेल्याने त्यांना काय त्रास सोसावा लागतोय हे एका बदक आणि राजहंसचे प्रतीक वापरत अत्यंत सोप्या भाषेत यात गदिमांनी मांडलंय . आपण जर समाजाकडे उघड्या डोळस नजरेने बघितले तर अशी प्रतिभेची योग्य प्रकारे दाखल न घेतलेली अनेक राजहंस  दिसतात. आपल्यापेक्षा कमी प्रतिभा असलेली माणसे आपल्या पुढे जात आहेत हे बघताना त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल हे आपण त्या गाण्यातून समजावून घेऊ शकतो .  एखाद्याकडे अपार क...

रफी साहब, आपने मराठी को किरणे खूबसूरत चांद , दिये मान गये !

इमेज
 दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.काही कामानिमित्त पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोने प्रवास करत होतो. वेळ दुपारची असल्याने फारशी गर्दी नव्हती. माझ्या शेजारीच एक सत्तरीचे आजोबा प्रवास करत होते. आजोबानी मेट्रोच्या संगीताच्या नियमाला बगल देत हेडफोन न वापरता, मोबाईलवर गाणी लावली होती. त्यामुळे त्या गाण्याच्या आस्वाद मला देखील घेता आला. आजोबानी शोधिसी मानव लावुनी अंतरी,  प्रभू तू दयाळू कृपावंत  दाता, हा छंद जीवाला लावी पिसे, हा रुसवा सोड सखे, हे मना आज कोणी बघ तुला या सारखी गाणी आपल्या मोबाईलवर लावली होती  आजोबांची गाणी शांत संगीताची आणि सहज गुणगुणता येतील या प्रकारच्या मराठी भाषेतील असल्याने मी आजोबांना गाणी आवडल्याचे सांगितलेत्यावर त्यांनी स्मितहास्य देत,ही  सगळी गाणी पंजाबी मुसलमान असलेल्या मोहंमद रफी यांनी गायलेली आणि श्रध्येय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे  भाऊ श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत अशी माहिती पुरवली. त्यांना शिवाजीनगर येथे जायचे असल्याने ते उतरून गेले मात्र  त्यांनी एका नव्या वादळाला जन्म दिला . हे वादळ होते मराठीला किती समृद्ध व...

दिव्यांगांविषयीच्या आपल्या जाणिवा वाढवणारा चित्रपट 'कोशीश

इमेज
चित्रपट हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. हे माध्यम जर खुबीने वापरले तर फार मोठा संदेश सहजतेने देता येतो. इतर ‌वेळी काय कटकट आहे, असे म्हणून संदेश  देणाऱ्याचे नावे बोट मोडण्याची वेळ  येण्याची शक्यता १०० टक्के आहे असे सदेश देखील समाजात मोठ्या प्रमाणात देण्याची ताकद या माध्यमात आहे.ती देखील अरे आपल्याला संदेश देण्यात आला आहे,याची विशेष वेगळी जाणीव न होता. मात्र इतकी प्रभावी ताकद असून देखील या माध्यमाचा सकारात्मकतेने वापर केले गेल्याची उदाहरणे फारच तूरळक आहेत‌. या तूरळक उदाहरणामध्ये नाव घ्यावेच लागेल असा चित्रपट म्हणजे कोशीश. १९७२ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी चित्रपट म्हणून कोशीश ओळखला जातो. त्याचे दिग्दर्शक गुलझार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि संजीवकुमार यांनी साकरलेली  मूक-बधिर दांपत्याची भूमिका आपणास विचार करायला भागच पडते ‘कोशीश’ची कथा हरिचरण आणि आरती या दोघांच्या आयुष्याभोवती फिरते. बोलता व ऐकता न येणाऱ्या दोन व्यक्ती समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कशी झुंज देतात, याचे हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. संव...

संवादाची नवी परीभाषा उलगडणारा चित्रपट 'पुष्पक'

इमेज
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडते. संवाद साधायला मनुष्य त्याला निसर्गाकडून मिळालेल्या अनोख्या अस्या स्वरयंत्रातून विविध आवाज काढतो. या आवाजातून भाषा तयार होते आणि मनुष्य या भाषेच्याद्वारे संवाद साधतो,असे समाजशास्त्रज्ञ नेहमी सांगतात. मात्र भाषाद्वारेच संवाद साधता येतो का, की भाषेशिवाय देखील अन्य संवादाची माध्यमे आहेत याचा अभ्यास करता समोर येणारे चित्र मोठे मनोरंजक आहे‌, आणि या मनोरंजक विश्वाची ओळख होते,ती बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते असलेल्या कमल हसन यांनी १९८७ साली भुमिका केलेल्या 'पुष्पक' या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सिंगीतम् श्रीनिवास राव, तर सिंगीतम् श्रीनिवास राव आणि श्रृंगार नागराज या दोघांनी मिळून त्याची निर्मिती केली होती. कमल हसन यांनी हिरोची तर हिरोईनच्या भुमिकेछ अमला अक्किनेनी होत्या. अन्य प्रमुख कलाकारांचा विचार करता रमेश, फरीदा जलाल, प्रताप पोतन, लोकनाथ, पी. एल. नारायण, रम्या  आदींनी यात भुमिका केल्या होत्या   बंगळूरूमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात एक देखील संवाद ना...

पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...

इमेज
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. काही गाणी त्याला दिलेल्या संगीतामुळे उत्तम या प्रकारात मोडतात. काही गाणी ती ज्या पार्श्वभुमीवर चित्रीत झालेली आहेत, त्यामुळे काही गाणी छान वाटतात. तर काही गाणी त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे सर्वोत्तम श्रेणीत मोडतात.या सर्वोत्तम श्रेणीत मोडणारे एक गाणे म्हणजे, २००४ मे मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम तूम' या चित्रपटातील एक गाणे‌. पुरुषांच्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व अधोरेखित करणारे 'इसलिये लडकीया लडकोंसे नही होती,हे गाणे. जतीन -ललित या सुप्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केलेले आणि अलका यागनिक- शान यांनी आवाज दिलेले हे गाणे, चित्रीत झाले आहे, राणी मुखर्जी आणि सैफ अली खान वर. अभिनयाच्या क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या आवाजात दोष असून देखील त्यावर मात करत एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून राखी मुखर्जी ओळखल्या जातात. त्यावर स्वतंत्र्यपणे लिहता येऊ शकते, मात्र तूर्तास इतकेच. सहा मिनीटे इतक्या मोठ्या कालावधीचे गाणे परदेशात चित्रीत झाले आहे‌. सुरवातीला सैफ महिला किती त्रासदायक आहेत‌. महिला प...

एक नजर त्यांचा कामावर

इमेज
मी काही महिन्यापुर्वी छावा हा चित्रपट  बघितला. चित्रपटातून आपणास अनेक अज्ञात बाबी समजतात.त्याबद्दल चित्रपट निर्मात्या रवी कौशीकचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्याच्यामुळे मराठ्यांचा ज्वाजल इतिहास समस्त देशवासीयांच्या समोर आला.या चित्रपटाविषयी अनेकांनी भरभरुन लिहल्याने त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही.तितकी माझी पात्रता देखील नाही मला तूमचे लक्ष वेधून घेण्याचे आहे.कोणताही चित्रपट संपल्यावर चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यावर गुंतलेल्या व्यक्तींची जी यादी येते त्याकडे            माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणाऱ्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त्याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे                   त्यातील काही जणांना विविध पुर...

कोण बघतो कश्यासाठी चित्रपट

इमेज
कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा  नुकताच माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते              फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक ...

सदैव चिरतरुण असणारा चित्रपट, 'सिंहासन'

इमेज
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मोठा आशय असलेले अनेक चित्रपट आहेत.दोघी, नितळ, देउळ, देउळबंद, दहावी फ, सामना ,सरकारनामा ही त्यातील काही मोजकी उदाहरणे. मराठी चित्रपटसृष्टीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर आधारीत चित्रपट दिले आहेत. पत्रकारीतेचा विचार करता  हार्ड  बीट समजल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारीत चित्रपट मराठीत आहेत. सरकारनामा, सिंहासन ही त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल  सिंहासन हा चित्रपट तर समस्त भारतीय भाषेतील उत्कृष्ट  चित्रपट म्हणता येईल.16 नोव्हेंबर 1979 रोजी रसिकांसाठी खुला झालेला  या  चित्रपटाला 46 वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो ,त्याचे नाट्य रूपांतरण वाटावे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,     हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो  सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई (त्यावेळचे  व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग  शॉर्ट  फोकस ...

कांदे पोहे

इमेज
कांदे पोहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या अति परीचयातील पदार्थ. विवाह जूळवतांना  पुर्वी हमखास केला जाणारा पदार्थ. तर माझ्या सारख्या मुळच्या नाशिकमधील मात्र शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने पुण्यातील पेठांमध्ये बरेच काळ वास्तव्य केलेल्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याची सुरवात करणारा पदार्थ. सहजतेने पाच मिनीटात तयार होणारा हा पदार्थ .सध्या बाजारात कांद्यांचे आणि शेगदाण्याचे भाव किती आहेत याचा बातम्या न बघता, बाजारात न जाता अत्यंत खराखुरा वृत्तांत सादर करणारा खाद्यपदार्थ म्हणजे कांदेपोहे. आपल्या चित्रपटसृष्टीत, साहित्य विश्वात कांदेपोहे हा मोठा विषय आहे.सनई चौघडे या मराठी चित्रपटात तर आयुष्य म्हणजे कढईतील करपलेले कांदेपोहे  असे सांगत, कांदे पोह्यांना आयुष्यातील भल्याबुऱ्या प्रसंगाशी जोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कधीही नाश्त्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे.        तर गरमागरम कांदेपोहे आणि त्यावर  लिंबू पिळल्यावर असे कांदेपोहे खाणे हणजे रस्त्यावरचे स्वर्गसुख म्हणता येईल. मात्र काही कारणाने आपल्या महाराष्ट्रात सध्या या कांदा पोह्यांची वाट ल...