पोस्ट्स

ऑक्टोबर १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्य देत नाही, मग आपण का देयचे ?

इमेज
                             १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी  गेल्या काही  वर्षांपासून एसटीला मानव विकास कार्यक्रअंतर्गत  देय असणारे देयके   देण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी देण्याची बातमी येऊन धडकली.  ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न काही अंशी सुटल्याचे या बातमीत सांगितले होते  महामंडळ ग्रामीण विद्यर्थ्यांना शिक्षण घेणे सोईचे व्हावे यासाठी भाड्यात विशेष सवलती देण्याचा  उपक्रम काही वर्षांपूर्वी महामंडळाने राबवला होता त्यामध्ये होणारा तोटा सरकारकडून भरून दिला जाणार होता . मात्र सरकारकडून हे देणे कित्यके वर्षे देण्यात आले नव्हते .ज्यामुळे महामंडळाला होणारा तोटा भरून निघत नव्हता . याचा काही अंशी परिणाम महामंडळाचा संचित तोटा होण्यास झाली महामंडळाने यासाठी साध्या  गाडयांना आकर्षक आकाशी रंग देखील दिला होता .        महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या भारतात सर्वाधिक सवलती देते असे सांगितले  जाते . तेव्हापासून मला प्रश्न पडला आहे की, एकीकडे महामंडळ तोट्यात असताना अनावश्यक सवलती कश्यासाठी दिल्या जात आहेत ?  माझ्यामते या सर्व भाडे सवलतीच्या आढावा घेऊन त्यांची संख्या किमान पातळीवर आणावी