पोस्ट्स

जून ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव्या पायंडाला प्रारंभ

इमेज
         भारताने जगाला अनेक गोष्टींची देणगी दिली आहे अनेक गोष्टींची सुरवात पहिल्यांदा भारतात झाली अनेक शोध पहिल्यांदा भारतात लागले . त्यानंतर त्या गोष्टी जगाने स्वीकारल्या अंकगणित सोपे करणाऱ्या शून्याचा शोध असो किंवा शारीरिक क्षनमतेबरोबर बौद्धिक क्षमता जोखणारा बुद्धिबळासारखा खेळ असो  किंवा आता बॅडमिंटन सारखा शारीरिक क्षमता जोखणारा खेळ असो (बॅडमिंटनच्या शोध पुणे या शहरात लागला आहे )  या गोष्टींची यादी केल्यास यामध्ये अनेक गोष्टींचा सहजतेने समावेश करता येईल आगामी काळात या यादीत अजून एका गोष्टीची भर पडणार आहे .          २८ जुलै ते १० ऑगस्ट या काळात चेन्नई या शहरात  होणाऱ्या ४४ व्या  बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेद्वारे बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या एका नव्या पर्वाला सुरवात होणार आहे १९२४ पासून होणाऱ्या बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत  चेन्नई येथे होणाऱ्या  बुद्धिबळ ऑलम्पियाडपासून मशाल दौड सुरु करण्यात येणार आहे या आधी झालेल्या ४३ बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत मशाल दौड आयोजित करण्यात आलेली नव्हती चेन्नई  येथे होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभंकर  ऑलम्पियाड पासून मशाल दौडाच्या  नव्या पायंडाला प्रारंभ होत असल्

हळव्या मनाचा बाल साहित्य निर्मितीकार ... साने गुरुजी*

इमेज
आजकाल लहान मुले फारसी वाचत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येते. या विषयावर चर्चा करताना काही जण आता मुलांना  वाचायला बालसाहित्य कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विपूल प्रमाणात बालसाहित्य निर्माण करणाऱ्या साने गुरुजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज 11 जानेवारी 2021 रोजी त्यांची 71वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली .    साने गुरुजींचे श्मामची आई हे पुस्तक खुपच प्रसिद्ध असले तरी त्यांचे फारसे प्रसिद्ध नसणारे बालसाहित्य प्रचंड आहे. बालमनावर उत्तम संस्कार करत असतानाच त्यांचे मनोरंजन करण्याचे दुहेरी कार्य त्यांचा लेखनातून  उतरलेले सहजतेने दिसते. अनेकदा संस्काराचा नावाखाली मुलांना नकोसे वाटेल असे बोजड साहित्य मुलांचा माथी मारले जाते. किंवा मनोरंजनाखाली  काहीही संस्कार  करत नसलेले साहित्य त्यांचा माथी मारले जाते. दुसऱ्या प्रकारचे उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालेली कार्टून्स .तर पहिल्या प्रकारात विविध अध्यात्मिक प्रवचने देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करता येईल. साने गुरुजींचे बालसाहित्य मात्र या दोन्ही टोकांचा ठिकाणी न जाता त्याचा