पोस्ट्स

जानेवारी ८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

योद्धा संन्यासी

इमेज
  मरगळलेल्या समाजाचा देश जो   स्वतःचे सत्व विसरलेला होता , त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत   नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे   स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश . १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते .        स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप   गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी स्वतः रामकृष्ण मठातील युवक वर्गाचा फायदा घेतला आहे . खूप प्रेरणादायी अनुभव प्रत्येकवेळेस मला आला आहे स्वामी विवेकानंदानी पाशात्य देशात भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली

स्वामी विवेकानंद भगव्या कपड्यांना नवा अर्थ देणारे व्यक्तीमत्व

इमेज
          स्वामी विवेकानंद यांचे नाव ऐकलेले नाही , असा खचितच कोणी भारतात असेल येत्या गुरुवारी त्यांची १६० वी जयंती   त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली .                स्वामी विवेकानंद यांनी संन्यास्याश्रमाला व्यापक अर्थ दिला . संन्याशी म्हणजे समाजापासून दूर झालेला मोक्ष मिळण्यासाठी सर्व परीत्याग करुन , इश्वरभक्तीत गुंतलेला व्यक्ती ही ओळख पुसून , संन्यासी म्हणजे समाजाला प्रचंड प्रमाणात विविध प्रकारे मदत करणारा व्यक्ती ही नवी ओळख दिली . त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची उभारणी केली . मी स्वतः पुण्यात असताना रामकृष्ण मठाच्या विविध समाजोपयोगी सेवांचा फायदा घेतला आहे . अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवांसह विविध प्रकारच्या कार्यामुळे   युवकांची उन्नती होण्यासबंधी विविध उपक्रम रामकृष्ण मठाद्वारे राबवले जातात . मी रामकृष्ण मठाच्या जानेवारी महिन्यातील युवा शिबिरास तसेच त्यावेळेस दर रविवारी युवकांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांस उपस्थित राहत असे .( काही वर्षापुर्वी त्यांचाकडून दर