पोस्ट्स

ऑक्टोबर २८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हीच ती का मराठी ?

इमेज
            गेल्या आठवड्याभरापुर्वीची गोष्ट आहे एका मित्राने मला फोन केला होता, नेहमीचे क्षेमकुशल झाल्यावर त्याने तूझ्याकडे अरे ते पुस्तक आहे का ?  असा प्रश्न केला.मित्राने विचारलेले पुस्तक मराठीतील एक नामांकित पुस्तक होते. तेव्हापासून एक प्रश्न मला सातत्याने मनात येत आहे, की आपल्या मराठीत अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती आहेत, ज्यावर अनेक दिर्घ कालावधीच्या मालिका सहजतेने तयार होवू शकतात, ज्या लहानमुलांसह प्रौढ व्यक्तीही सहजतेने बघू शकतील अस्या असताना अत्यंत कटकारस्थांनी भरलेल्या, विविध प्रकारचे गुन्हे सहजतेने दाखवणाऱ्या मालिका मराठीत का बनत आहेत.                जे मालिकांचे तेच विनोदी कार्यक्रमाचे आपल्या मराठीत चि.वि जोशी, पु.ल. देशपांडे, व. पू. काळे, यांच्या सारखे सकस विनोदी लेखन करणारे साहित्य असताना महिलांचे कपडे पुरूषांनी घालणे, आणि विनोद निर्मिती करणे , यात काय हशील? एकेकाळी वाईटपणाचा शिक्का बसलेल्या तमास्यात या प्रकारचे विनोद असतात.आणि ते सादर करण्यास नाच्या म्हणतात ,जो मानाच्या दृष्टीने अत्यंत कमी असतो. आपल्याकडे रहस्यकथांची  मोठी परंपरा आहे. मात्र सोनी टिव्हीवरील सि आय डी सारखा अने