पोस्ट्स

एप्रिल २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

करावे तसे भरावे

इमेज
           आपण शेजाऱ्याला त्रास  देण्यासाठी घरात साप पाळले तर वेळ मिळाल्यास ते शेजारच्या घराबरोबर आपल्या स्वतःच्या घरात देखील धुमाकूळ घालू शकतात .तेव्हा साप पाळणाऱ्या व्यक्तीने त्याची सुद्धा तयारी करावी  असे विधान अमेरिकेच्या  माजी  सेक्रेटरी ऑफ स्टेट( परराष्ट्र मंत्री समकक्ष ) हिलरी क्लिंटन यांनी भारत पाकिस्तान विषयी बोलताना एकदा केले या विधानाचा अनुभव साध्य पाकिस्तान घेत आहे फरक इतकाच की पाकिस्तान भारताच्या संदर्भात नाही तर अफगाणिस्तान विषयी हा अनुभव घेत आहे           अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त सरकार उलथवून टाकून अफगाणिस्तानात तालिबानचा उदय होण्यासाठी पाकिस्तानाने सर्वोत्तपरी प्रयत्न केले अफगाणिस्तानमध्ये तालिबान चा उदय झाल्यास तेथील सरकार आपले कळसूत्री बाहुले असेल ज्यामुळे आपणस जगात आपली प्रतिमा उजळण्यास मदत होण्याबरोबरच  कशिमरविषयी आपला रंग आळवण्यास मदत मिळेल अश्या भ्रमातून पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यास मदतच केली मात्र जसे नव्याचे नऊ दिवस असतात त्या प्रमाणे काही दिवस सरल्यावर अफगाणिस्तानमधील तालिबाबानी  पाकिस्तानची नवी डोकेदुखी ठरू शकतात असे भविष्यसूचक वक्तव्य त