पोस्ट्स

सामाजिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दर 44 मिनीटांनी एक!

इमेज
        दर 44 मिनीटांनी एक हा दर आहे 2022मधील विद्यार्थी आत्महत्येचा .4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालातून ही आकडेवारी जगासमोर आली.या अहवालानुसार 2022साली 12,000 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. दर दिवशी 33 तर दर 44मिनीटांनी एक आत्महत्या इतका हा दर भयावह आहे. आपल्याकडे एक टी 20 क्रिकेट मॅच ही साडेतीन तास चालते. या हिशोबाने बोलायचे झाल्यास एका मॅच दरम्यान पाच विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले असते.      काही वर्षांपूर्वी आलेल्या थ्री इडियटस् या चित्रपटाद्वारे या गंभीर विषयाला हात घातला गेला होता. त्यावेळी त्यावर काही प्रमाणात चर्चा देखील झाली होती.मात्र कालांतराने सर्व काही थंड झाले‌.त्यावेळी हा गंभीर प्रश्न  सोडविण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना या सोईस्करपणे गुंडाळण्यात आल्या. ज्याचा परिणामस्वरूप विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख चढताच राहीला. विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न मात्र करण्यात आले.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा ,टेलीफोन हेल्पलाईन सेवा आदि...

हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

इमेज
         आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.           मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय सं...

परंपरावाद्यांविरोधात एका महिलेने केलेल्या बंडाची कहाणी,--गार्गी अजून जिवंत आहे.

इमेज
    सध्या आपल्या भारतात सर्वत्र नारी शक्ती विधेयकाबाबात चर्चा सुरु आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी  एका स्तंभात अर्थात विधीमंडळात त्यामुळे महिला वर्गाचा सहभाग त्यामुळे नक्कीच वाढेल. आज असे कोणतेही क्षेत्र नसेल ज्यामध्ये महिलावर्ग पुरुषांना खांद्याला खांदा लावून सक्षमतेने काम करत नसेल. अगदी एखाद्या माणसाचे निधन झाल्यावर स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कार विधीचा देखील अपवाद याला नाहीये‌. उत्तर प्रदेश सारख्या अजूनही जाती भेद उच्च निच्चता मोठ्या प्रमाणात पाळले जाणाऱ्या राज्यातील इलाहाबाद या शहरात देखील आपणास हे कार्य करणारी एक महिला कार्यरत आहे. हे मला समजले ते मी पुर्वी  वाचलेले असुन देखील सध्या पुन्हा एकदा  वाचत असलेल्या एका पुस्तकामुळे . "गार्गी जिवंत आहे", हे त्यांचे नाव. .राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकामुळे मला ही माहिती समजली.     हे पुस्तक प्रसिद्ध होवून बराच काळ लोटला आहे, त्या अर्थी हे पुस्तक जून्या या वर्गवारीत मोडते.माझे देखील हे पुस्तक पहिल्यांदा वाचले त्यास कैक वर्षे लोटले, मात्र स्वतः कडे असून देखील या बाबत लिहले नव्हते, जे आत...

दक्षिण कोरियाचा घटनेतून आपण काय बोध घेणार ?

इमेज
           गेल्या बुधवारी अर्थात २० सप्टेंबर रोजी दक्षिण कोरिया या देशाच्या संसदेने एक शिक्षण विषयक कायदा केला . जो  कायदा आपल्या भारताला देखील खूप काही शिकवून जाणारा आहे  शिक्षणाचा सर्वगाडा ज्या शिक्षकांवर असतो त्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या संबंधावर मोठा दूरगामी परिणाम करणारा हा कायदा आहे .एका २३ वर्षीय शिक्षकाने पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्रासून जाऊन आत्महत्या केल्याची काळी किनार या कायद्यास आहे. या कायद्यान्वये शिक्षकांना पालकांनी तक्रार केल्यावर लगेचच कामावरून कमी करण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे तसेच त्यांना कायदेशीर मदत पुरवणे , तसेच त्यासाठी योग्य  प्रमाणात आर्थिक मोबदला देणे या जवाबदाऱ्या मुख्याध्यापकांवर  सोपवण्यात आल्या आहेत  तसेच शिकवताना अडथळा आणणाऱ्या विद्यार्थ्यास माफक प्रमाणात शिक्षा करणे आधी अधिकार मिळणार आहेत .या प्रकारच्या कायदा करण्यात यावा या साठी दक्षिण कोरियातील शिक्षकांनी देशभर आंदोलन केले होते    (दक्षिण कोरिया हा टीचभर क्षेत्रफळाचा देश आहे )  ज्याच्या परिणामस्वरूप हा कायदा करण्यात ...

कोट्याच्या घटनेतून आपण काय शिकणार ?

इमेज
         कोटा आणि पुणे दोन्ही शहरे ही  स्पर्धा परीक्षा या क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्वाची समजली जातात. दोन्ही शहरामध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि देशभरातून येतात. लोकसेवा आयोगाची असो किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी  द्यावयाची प्रवेश परीक्षा असो,  ती स्पर्धा परीक्षा असल्याने त्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारखाच ताण असतो . त्यांच्या अडचणी सारख्याच असतात . त्यामुळे एका शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना ज्या अडचणी भेडसावतात,त्याच अडचणी दुसऱ्या शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जाणवणार हे सूर्य प्रकाश्याइतके स्पष्ट आहे. त्या सोडवण्याचा पद्धती देखील सारख्याच असणार.. मात्र एकाचवेळी दोन्ही शहरांत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारख्याच समस्या जाणवतील असे नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांतील घडामोडी दुसऱ्या शहरासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतात. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कोटा शहरातून येणाऱ्या बातम्या...

सोपी वाक्ये वाचता येणे ,साधे अंकगणित झाले कठीण

इमेज
         सोपी वाक्ये वाचता येणे , साधे अंकगणित झाले कठीण , शिर्षक बघून चमकलात ना ! हे कसले शिर्षक, असा प्रश्न आपणास पडला असेल तर सांगतो. देशाची शैक्षणीक सद्यस्थिती स्पष्ट करणाऱ्या, प्रथम या स्वंयस्वेवी संस्थेच्या असर या अहवालात 2022सालची जी स्थिती सांगण्यात आली आहे. तीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास असेच करावे लागेल.या अहवालानुसार देशातील पाचवीतील २८. २ क्के विद्यार्थाना साधी दोन अंकी वजाबाकी करता येत नाही तर  २७. ३  टटक्के विद्यर्थाना दुसरीत शिकवले जाणारा मजकूर देखील वाचता येत नाही गेल्या अहवालापेक्षा  (सन २०१८ ) हे प्रमाण वाढलेले आहे त्यावेळी २०. ५ टक्के  मुलांना वाचता आणि २५. ९ टक्के विद्यर्थाना साधे अंक गणित करणे जमत नव्हे कोव्हीड १९ च्या साथरोगामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे हे प्रमाण काहीसे घसरले असे सामील तरी हि घसरण चिंताजनक आहे . बुधवार १८ जानेवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ज्यासाठी देशातील ६१६ जिल्ह्यतील १ ९ हजार  गावातील ७ लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे देशातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विदय...

जागतिक स्तरावर हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात

इमेज
         गुरुवार १२ जानेवारी रोजी युनाटेड अरब अमिरात ( युएइ ) या   देशाने केलेल्या एका घोषणेने जागतिक स्तरावर    हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात झाली आहे . चालू वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात   किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यात    युनाटेड अरब अमिरात या देशात होणाऱ्या Conference  Of Parties ( जे   आपल्या अद्यक्षरांवरून COP नावाने अधिक प्रसिद्ध आहे ) च्या अधिवेशनाच्या संदर्भात केलेल्या एका घोषणेने हा वाद सुरु झाला आहे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या राष्ट्रीय तेल उत्पादक कंपनीचे कार्य्रकरी प्रमुख या COP २८ चे प्रमुख   असतील हीच ती घोषणा होय . कोल्ह्याच्या तावडीत बकऱ्यांची सुरक्षा देण्याचा हा प्रकार आहे / स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यक्तीच्या हाती पर्यावरणाच्या संरक्षणाची जवाबदारी कोणत्या अधिकारात देता येऊ शकते ? चोराच्या हाती खजिन्याचा किल्ल्या देण्याचा हा प्रक...

ऋषभ पंत यांच्या अपघातामुळे निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न

इमेज
    भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू   ऋषभ पंत यांच्या कारला राष्ट्रीय महामार्ग ५८वर शुक्रवरी  पहाटे गंभीर अपघात झाला . स्वतः गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला या अपघाताच्या निमित्याने या आधी अनेकदा चर्चिले गेलेल्या मात्र तरीही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला . तो म्हणजे आपले रस्ते वेगवान वाहने चालवण्यासाठी सक्षम असले तरी चालकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती अश्या प्रकारे वेगवान वाहन चालवण्यास सक्षम आहे का ?           आपल्याकडे रस्ते मोकळे दिसले की  अनेक भल्या भल्या लोकांना एक्सलेटरवर पाय देण्याचा मोह आवरत नाही . रस्ता मोकळा दिसला की , तो आपणास गाडीची वेगमर्यादा ओलांडयाचा परवानाच दिलेला आहे या प्रकारचे वर्तन चालकांकडून अनेकदा घडते . अपघाताच्या वेळी अशी वेगवान गाडी नियंत्रणात आणणे अशक्यप्राय होते आणि अपघाताची तीव्रता मोठ्या प्रमाणत वाढते .  आपणास महामार्गावर प्रवास करताना वेग आवरा स्वतःला सावरा या सारख्या ज्या पाट्या दिसतात त्या मनोरंजासाठी नसतात तर आपणास सावध करण्यासाठी अ...

सिंहावलोकन २०२२ सार्वजनिक वाहतूकव्यवस्था

इमेज
            इंग्रजी नववर्ष सुरु होण्यसासाठी आता मोजकेच दिवस बाकी आहेत . या सरत्या २०२२ वर्षाचा विचार करता सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा विचार करता , अनेक बदलांचे वर्ष ठरले , कोणत्याहीउ देशाच्या प्रगतीत त्या देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे आपल्या भारताचा विकासाचा अभ्यास करताना हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरतात . चला तर मग जाणून घेउया हे बदल     आपल्या भारतात दोन प्रकारची सार्वजनिक   वाहतूक आहे त्यातील पहिली म्हणजे   सर्व भारतभर पसरली आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणारी आपली भारतीय रेल्वे तर दुसरी आहे वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारी त्या त्या राज्याची स्वतंत्र अशी सार्वजनिक परिवहन सेवा ज्यास सर्वसाधारणपणे एसटी असे संबोधनात येते . सरत्या २०२२ वर्षात दोन्ही प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बदल झाले पहिल्यांदा आपण रेल्वे या सर्व भारतभर पसरलेल्या वाह...