शनी जयंती विशेष !
भारतीय तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते. भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या दिवशी भगवान सुर्याची प्रथम पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळे, केलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला, असी धारणा आहे. शनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते ,कृष्णवर्णीय झाले. या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला. त्यांनी त्यास हळू चालण्याचा शाप दिला. पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती चालगती अजूनच मंदावली. माझ्या माहितीनुसार भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही. भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी रंजक आहे, तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे. आजमितीस सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह हे शनी या ग्रहास आहे.श नीग्रहास 82 नैसर्गिक उपग्रह आहेत. यातील सर्वात मोठा उपग्रह टायटन तर बुध ग्रहाएव्हढा मोठा आहे.आपल्या सौरमाल...