पोस्ट्स

ऑक्टोबर ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचे लक्ष आता पॅसिफिक महासागराकडे

इमेज
     सध्या भारताकडून विविध देशांशी संबंध अधिक मैत्रीपूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे ऑगस्ट  आणि सप्टेंबर महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ . एस जयशंकर यांचा  जपान , युनाटेड अरब अमिरात , सौदी अरेबिया या देशात आणि भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग याचा जपान , मध्य आशियातील पाचही इस्लामधर्मीय देशांचा आणि आग्नेय आशियातील देशाचा दौरा हेच सुचवत आहे या देशांशी शाश्त्रात्रे विक्री तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वृद्धीला राजकारणाचा विचार करता  साह्य होतील याबाबत करार केल्यानंतर भारताने आता आपला मोर्चा पॅसिफिक महासागरातील देशांकडे वळवला आहे       जागतिक राजकारणाचा विचार करता जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू पश्चिम युरोप आणि अमेरिका या भागातून जाऊन भारताच्या आसपासच्या समुद्रकिनारा तसेच पॅसिफिक महासागरातील विविध बेट स्वरूपातील देश आणि पॅसिफिक महासागराला किनारा असणाऱ्या देशाभोवती केंद्रित झाला आहे भू राजनॆतिक शास्त्राचा विचार करता या भागाला इंडो पॅसिफिक म्हणतात.  याच इंडो पॅसिफिक भागातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांना आपले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर