पोस्ट्स

नोव्हेंबर २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग4)

इमेज
       आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती तसेच बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ?  यावेळी आपण एखाद्या खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी पालकांची भूमिका किती महत्वाची असते ? हे बघूया   यशस्वी खेळाडूंच्या इतिहास बघितला तर,  खेळाडूंच्या पालकांच्या सहभाग महत्त्वपूर्ण असतो. मुळात महत्त्वाचे ,मोठे निर्णय घेण्याची क्षमता नसते . आर्थिक नियोजन,वेळेचे नियोजन या सारख्या बाबीबाबतचे निर्णय पालकालाच घ्यावे लागतात . आज अनेक पालक खेळाविषयी जागृत झालेले आहेत /त्यातही बुद्धिबळाकडे बौद्धिक विकासाच्या दृष्टीनेच पहिले जात आहे . त्यामुळे खेळाडूंची संख्या वाढत आहे . मात्र ज्या प्रमाणात खेळाडू घडले पाहिजे त्या प्रमाणाच्या तुलनेत आजही संख्या कमी आहे             पालकांची मनोभूमिका काय असते ?ते बघू . ज्यांना बुद्धिबळ येते असे पालक आपल्या पाल्यावर जिंकण्यासाठी दबाव आणतात ,  प्रसंगी एखादा सामना गमावला तर पाल्याला मारण्यासह ही कमी करत नाहीत . डाव हरणे अथवा जिंकणे , खेळाचा एक भाग आहे , हे ते प