पोस्ट्स

ऑगस्ट १५, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवी भूगोलाच्या निकषावर भारताची प्रगती आणि मी

इमेज
                सध्या भारताच्या प्रगतीविषयी विविध दावे केले जातंय . त्यातही बहुसंख्य  ठिकाणी पक्षीय राजकारण केलं जातंय . त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मान्य  होईल अश्या मार्गाचा विचार केला असता शात्राचा विचार करणे संयुक्तिक  होईल असे वाटून मी हा लेखन प्रपंच करत आहे .  " मानवी भुगोल" या भुगोलाचा उपशाखेच्या सिध्दांतांवर भारताच्या प्रगतीचे मुल्यमापन केल्यास भारताच्या प्रगतीचे खरेचित्र समोर येते. असे मला वाटत असल्याने त्यावर मी केलेले हे विवेचन आहे.             मानवी भूगोलाची उपशाखा असलेल्या लोकसंख्या भूगोलाच्या लोकसंख्या सिद्धान्तानुसार लोकसंख्या वाढीचे ५  टप्पे असतात . पहिल्या टप्यात खूप लोक जन्माला येतात आणि तितकेच लोक विविध आजारांनी मृत होत असतात. दुसऱ्या टप्यात देशाची स्थिती सुधारली असल्याने   कमी लोक साथीच्या आणि अन्य रोगांनी मारतात  मात्र जन्माला अधिक लोक येतात परिणामी देशाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते देशाच्या साधन संपत्तीवर प्रचंड ताण येतो . तिसऱ्या टप्यात कमी लोक मृत होतात ,लोकानां लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम माहिती असल्याने त्यांच्याकडून जन्मदर नियंत्रित केले जातो