पोस्ट्स

जुलै २२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे आग बुझती क्यु नही !

इमेज
    आज 22 जूलै रोजी हा मजकूर लिहीत असताना तळ कोकणात आणि मुंबईत पावसाने हाहाकार उडवला असताना अमेरीका आणि कँनडामध्ये वणव्याने तेथील प्रशासनाला अक्षरशः रडकुंडीला आणले आहे. अमेरीकेच्या 13 राज्यात लाखो हेक्टर जमिन वणव्याने भस्मस्यात केली आहे. कँनडाच्या ब्रिटिश कोलंबिया या राज्यात तर  या वणव्यामुळे तेथील प्रशासनाने राज्य आणिबाणी जाहिर केली आहे. अमेरीकेचे पश्चिम भागातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 88 आणि 89 हे वाहतूकीसाठी बंद करण्याची वेळ या वणव्यामुळे तेथील प्रशासनावर आली आहे. अमेरीकेच्या पँसिफिक किनाऱ्यावर लागलेली ही आग झपाट्याने पुर्वेकडे पसरत आहे.  दहा दिवसापेक्षा जास्त दिवसांपूर्वी लागलेली ही आग शर्थीचे प्रयत्न करुन देखील विझता विझत नाहीये. अमेरीकेच्या केंद्रीय प्रशासनाने 88 वणव्यांना अनियंत्रीत वणवे म्हणून जाहिर केले आहे. हे वणवे लोकवस्तीच्या जवळ आल्याने प्रशासनाच्या त्रासात भरच पडली आहे. बी.बी.सी.,  सि.एन.एन., अल् जझीरा सारख्या वृत्तवाहीन्यांकडून  येणाऱ्या बातम्यांनुसार अद्याप जिवीत हानी झालेली नसली,  तरी मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शहरातील दृशमानता या वणव्य