पोस्ट्स

फेब्रुवारी १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वन्यजीव मानव संघर्ष अटळ

इमेज
            वन्यजीव मानव संघर्ष अटळ  आहे ,याची साक्ष देणारी घटनासोमवार ३१ जानेवारी रोजी नाशिककरांनी अनुभवली .नाशिकच्या  नाशिकरोड या उपनगरातील जयभवानी रोड परिसरातील नागरिकांना तब्ब्ल ७ तास बिबटयांनी अक्षरशः दशतीतीत ठेवले  . सोमवारी घडलेला प्रसंग काही नवीन नाही  तसे नाशिकच्या नाशिकरोड परिसर मखमलाबाद परिसर गंगापूर रोड परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचे अनेक प्रसंग यापूर्वी देखील घडले आहेत  मात्र गेल्या काही दिवसाचा विचार करता त्याची वारंवारता प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचेच दुःख आहे . गेल्या काही दिवसात या प्रकारच्या घटनांमध्ये आणि जंगली श्वापद पकडण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी वन खात्याला करावे लागणारे परीक्षम बघता येत्या काळात मानव आणि जंगली प्राणी यांच्यात संघर्ष पेटला तर आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती आहे        मानवाचे जंगलावर होणारे आक्रमण , मानवाच्याच  कृतीमुळे वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या , असणाऱ्या वन क्षेत्रात कमी झालेली तृणभक्षक प्प्राण्याची संख्या यामुळे गेल्या काही वर्षात वन्यजीव मानवी परिसरात घुसण्याचा  संख्येत प्रचंड वाढ होत आहे .कोणत्याही वन्य प्राण्याचे एक ठराविक क