पोस्ट्स

ऑगस्ट ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन त्यांच्या हौतात्म्यला !

इमेज
आपल्या भारतात स्वातंत्र्यपुर्व काळातच नव्हे स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अनेकांनी आपल्या   प्राणाचे मोल देऊन हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला , भारताचे माजी    लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य हे अश्याच काही आदरणीय व्यक्तीपैकी . एक . आपल्या भारतातून पंजाब हे राज्य स्वतंत्र देश होण्यापासून त्यांनी वाचवले . माझी जमतारीख १० ऑगस्टही त्यांची हौताम्यची तारीख . अश्या महत्त्वाच्या दिवशीमाझा जन्म झाल्याबद्दलमी देवाचे कायमच कृतज्ञ राहील .            जनरल अरुणकुमारवैद्य यांचे योगदान प्रामुख्याने ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहमीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे करण्यात येत असले तरी त्यांचे भारतासाठीचे योगदान या पेक्षा फार मोठे होते त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी दोलताबाद आणि परभणी क्षेत्रात निझामाच्या जुलमी रझाकराना गुढघे टेकायला भागपडले . अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६५    चं भारत - पाकिस्तान युद्ध . पंजाबमधल्या खेमकरण , असल उत्तर , चीमा