पोस्ट्स

जानेवारी २८, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शनी शिंगणापूर येथील वाद आणि स्वातंञ्यवीर सावरकर

इमेज
भारताच्या महान क्रांतीकारकांमध्ये समावेश होणार्या स्वातंञ्यवीर सावरकर यांच्या प्रयोवशनाला ( पुण्यतिथी दिन ) यंदा 2016 साली 50 वर्षे पुर्ण होत आहे . त्या निमित्याने त्यांचा विचाराचा आढावा घेत असताना मला लक्षात आले की समाजाला संपुर्ण स्वातंञ्यवीर सावरकर समजलेच नाहीस. त्यांनी मांडलेल्या विज्ञाननिष्ठ समाजरचनेला तसेच त्यांनी अंदमानातून सुटका झाल्यावर रत्नागिरी येथे केलेल्या समाजसुधारणेबाबत मला तरी फारशे लिहलेले दिसत नाही (माझे वाचन परीपुर्ण आहे असा माझा मुळीच दावा नाही . किंबहूना मी एक वेडा मनुष्य आहे असे समजणेच योग्य ठरेल ) स्वातंञ्यवीर सावरकर धर्मप्रेमी जरुर होते . माञ त्यांची श्रध्दा चिकित्सेवर आधारीत सश्रध्दा होती . प्रसंगी त्यांनी गाईच्या उपयक्तेवर देखील भाष्य केले . त्यांनी जातीजातीत पडलेले अंतर कमी करण्यासाठी रत्नागिरीत पतीतपावन मंदिर उभारले . माझा मते स्वातंञ्यवीर सावरकरांचे हिंदुत्व विज्ञानाधारीत होते . नकी पोथीनिष्ठ . माञ आज मला तरी याचा विसर पडला असे वाटते( हे माझे मत आहे . ज्याप्रमाणे हाताची पाची बोटे समान नसतात त्या प्रमाणे तुमचे मत भिन्न असू शकते याची मला पुर्ण जाणीव आहे .