पोस्ट्स

नोव्हेंबर १२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदरांजली एक मराठमोळ्या विज्ञान वेड्याला

इमेज
                                मला आज सकाळी खगोलशास्त्राची रुची असलेल्या एका मित्राचा फोन आला, त्याने सांगितले अरे मोहन आपटे सर गेले . मी सुन्नच झालो . मोहन आपटे सर म्हणजे मराठीत विज्ञानविषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तींपकी  एक  मह्त्वाचे नाव .  सध्याच्या काळातील  हाताच्या बोटावर मोजता येईल , अश्या मराठीतून  विज्ञान विषयक  लेखन करणाऱ्या व्यक्तीपैकी एक .  माझा आणि त्यांचा संपर्क प्रत्यक्ष जरी नसला  तरी त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत , त्या अर्थाने एक वाचक आणि लेखन म्हणून आमचा खूप चांगला संबंध होता .                          संस्कृतप्रचुर समजण्यास कठीण  अश्या मराठीतील विज्ञान लेखनास त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अश्या पद्धतीने आकृतिबद्ध केले . त्यांच्या विज्ञानाच्या विविध शाखेतील  शास्त्राची माहिती देणारी मला उत्तर हवंय , ही  पुस्तकमाला खूप गाजली . किंबहुना त्यामुळेच हे घराघरात पोहोचले . सहज सोपी भाषा , प्रश्नोत्तरांचा स्वरूपातील पुस्तकांची भाषा यामुळे ही सर्वच पुस्तके गाजली .                                 त्यांनी निव्वळ विज्ञान विषयक लेखन केले असे नाही तर विज्ञान लोकप्रिय