पोस्ट्स

डिसेंबर ८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेले सुरत (भाग 2)

इमेज
                                    मी सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . रस्तेमार्गे होणाऱ्या कंटाळवाण्या प्रवासावर तोडगा म्हणून मी पूर्वी विविध माध्यमे वापरत असे , ज्यामध्ये विविध प्रकारच्या आणि मालकीच्या  बसेसचा समावेश असे . असेच एका प्रयोगात मला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत या बसचा शोध लागला . मला त्यांची आसनव्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि अन्य खाजगी बसेसपेक्षा अधीक  आरामदायी वाटल्याने आता मी शक्यतो नाशिक पुणे प्रवास याच बसने करतो . सातत्याने प्रवास केल्याने त्या बसच्या कर्मचाऱ्यांशी माझी मैत्री झाली आहे . त्यांच्या सततच्या आग्रहामुळे मी एकदा  त्या बसने सुरत प्रवास देखील केला त्याचे अनुभव तुम्ही या ब्लॉग च्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . त्याच प्रवासादरम्यान मला नाशिक सुरतच्या लोकप्रिय अश्या सापुतारा मार्गाबरोबर पेठ धरमपूर बलसाड  हा  मार्ग देखील माहिती झाला आणि माझी त्या मार्गाने सुरत पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता निर्माण झाली . माझे त्या प्रवासादरम्यानचे अनुभव आणि दुसऱ्यांदा आलेले सुरतचे  अनुभव सांगण्यासाठी आजचे लेखन     मी आधीचा