पोस्ट्स

मे २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेपाळचे बदलते रंग

इमेज
                                   सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे करोनाविषयी वृत्तांकन करत आहेत , हे आपण जाणतातच. करोना महाभयंकर आहेच यात शंका नाही , मात्र त्याचबरोबर भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधावर  परिणाम करणाऱ्या घटना देखील घडत आहेत . भारताचा एक शांततापूर्ण शेजारी देश अशी ख्याती असणाऱ्या नेपाळ या देशात घडलेल्या काही भारतविरोधी घटना या त्यापैकीच एक               भारत नेपाळ सीमा ही एक खुली सीमा असली तरी,  त्यामध्ये उत्तराखंड राज्याला लागून असणाऱ्या भारत नेपाळ सीमेवरील  सुमारे 400चौरस किलोमीटर क्षेत्राबाबत दोन्ही देशात मतभेत आहे . गेल्या दीड एक  वर्षांपासून  हे मतभेद अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे . सध्याच्या घडामोडी या याचा क्षेत्राशी संबंधित आहे . आणि या वादाला पार्श्वभूमी आहे ती ब्रिटिश भारत आणि नेपाळ या दरम्यान झालेला करार . या करारान्वये भारत , नेपाळ आणि चीन या तीन देशाच्या सीमारेषा ज्या भागात एकत्र येतात , त्या भागात उगम पावणाऱ्या काली नदीच्या  ( या नदीला इतर नावानी सुद्धा ओळखतात . मात्र आधिक प्रचलित नाव काली नदी हे आहे )  डाव्या तीरापर्यंत नेपाळची हद्द तर