पोस्ट्स

फेब्रुवारी १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

इमेज
                   आपण रस्त्यावरून जाताना एक पाटी अनेकदा बघतो , मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक . खूपच अर्थपूर्ण वाक्य आहे हे ! रस्त्यावरून जाताना मनाला यावर घातला की त्यामुळे आपसूकच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाते परिणामी वाहन अनियंत्रित होत नाही जर दुर्दवाने  काही कारणाने वाहन अनियंत्रित झालेच  तर वाहन लगेचच नियंत्रणात येते त्यामुळे मोठा अपघात  टाळून त्यांमुळे येणारे शारीरिक अपंगत्व किंवा काही प्रसंगी येणार मृत्यूही टाळला जातो हे सर्व मोजक्या शब्दात सांगण्यासाठी हि वाक्यरचना वापरली जाते . माझ्यामते फक्त रस्त्यावर नाही तर रोजच्या आयुष्यात देखील उपयोगी पडणारी ही वाक्यरचना आहे आपण नुकताच नाशिक जिल्ह्यतील - देवळा तालुक्यात घडलेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या कुटुंबियांकडून सामूहिकरीत्या घडलेला खून हे हेच सुचवत आहे . लग्नाला मोडता घालत असेल तर पोलिसी कारवाई करता आली असती मात्र रागाच्या भरात प्रियकरला पेटवून त्या कुटूंबियाला काय मिळाले ? आता ते बराच काळ तुरुंगात राहतील त्या अर्थी ते कुटूंबीय संपलेच आणि ज्या प्रियकराच्या खून करण्यात आला  ते घर देखील संपले ना ? प्रेयसीच्या घरातील व्यक्तींनी मनाचा