पोस्ट्स

जानेवारी ३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्पर्धा परीक्षेतील घोटाळा माध्यमात आलेला ( भाग 2)

इमेज
              सध्या आपल्या भारतात पारंपरिक माध्यमे नववर्षाच्या बातम्या देण्यात मग्न असताना,   मात्र राजस्थानातील हजारो युवक युवतींचा जीव टांगणीला लागलाय, आणि याला कारणीभूत ठरलाय,  तो राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निष्काळजीपणा  . ज्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत मे 2018ला संपते . त्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडतो तो तब्ब्ल दीड वर्षाने अर्थात 30 डिसेंबर 2019ला . बर पहिला टप्पा तरी शांततेत पार पडतो का ? याचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते . परीक्षा सुरु होण्याच्या दोन तास त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटते . परिणामी ती परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की राजस्थान लोकसेवा आयोगावर येते .परीक्षा नंतर घेण्यात येईल असे मोघम उत्तर प्रशासनकडून देण्यात येते . मात्र पुनर्परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात येत नाही .काय म्हणावे यास ? मागे 'गुजरात लोकसेवा आयोगाच्या' "बिन सचिवालय" या परीक्षेत सुद्धा अशाच प्रकार  घडला होता . (त्यावेळी  लिहलेल्ल्या ब्लॉगची लिंक या ब्लॉग पोस्टच्या शेवटी देण्यात आली आहे . ) मात्र  पुढच्यास थेच मागचा  शहाणा या न्यायाने  वागतील ती राज्य लो