पोस्ट्स

ऑगस्ट ४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आगरकरांचा वारसा चालवणारा पत्रकार रविशकुमार

इमेज
सध्याचा माध्यमांवर विश्वासाह्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना,  ज्याप्रमाणे अत्यंत  मिट्ट काळोखात एखादी मिणमिणती पणती मोठा उजेड देऊन जाते .आज जरी गडद काळोख असला तरी उद्या सोन्याची पहाट  होणार आहे  अशा विश्वास देते असेच एक नाव सध्या माध्यमात गाजते आहे . ते म्हणजे एन दि टी व्ही  या वृत्तवाहिनीवरील कार्यकारी संपादक , ज्येष्ठ  पत्रकार रवीश कुमार . कोणतीही पारिवारिक पाश्वभुमी नसताना बिहारसारख्या भारतातील अत्यंत मागास भागातून नवी दिल्लीत येऊन स्व कष्टातून पत्रकारितेत  स्वतःचे अढळ स्थान निर्माण  करणारा हा पत्रकार . या वर्षीचा आशिया खंडातील नोबेल समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगसेसे या 6 विविध क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या  पुरस्कारांपैकी पत्रकारिता या क्षेत्रात दिल्या गेलेल्या  मानकरी . म्हणजे रवीश कुमार .      सत्ताधिकाऱ्यांचा विरोधात कायम आवाज उठवून माध्यमांची जागल्याची भूमिका पार पडणारा पत्रकार इष्ट असेल ते करणारच  , योग्य असेल ते बोलणारच  याची आठवण करून देणारा पत्रकार म्हणजे रवीश कुमार . माझ्या आकलनानुसार दोघानींहि समाजसेवेचा वास घेतला होता . त्यासाठी त्यांनी स्वकियांशी वैर पत्कारले .