पोस्ट्स

डिसेंबर ५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ड्रॅगनच्या लष्करी सामर्थ्यावर नाटोत व्यक्त केली चिंता

इमेज
                         मित्रानो, सध्या विविध घटनांची भारताचे विश्व ढवळून निघत असताना , जागतिक परिस्थितीचा विचार करताना सुद्धा अनेक महत्त्वाच्या घटना घडत असल्याचे आपणास अनुभवयाला येत आहे . नुकतीच लंडन येथे झालेली दोनदिवसीय 70 वी नाटोची  परिषद ही त्यापैकीच एक . दुसऱ्या महायुद्धानंतर युनाइटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशाच्या  नेतृत्वाखाली स्थापन झालेली लष्करी संघटना म्हणजे नाटो . ज्यामध्ये सध्या 29 सदस्य आहेत . या 29मध्ये बहुतांशी युरोपीय देश आहेत . नाटोच्या या परिषदेत अनेक विषयावर चर्चा झाली .त्यातील अत्यंत महत्तवाचा विषय ज्याचा आपल्या भारताशी सुद्धा संबंध आहे , तो म्हणजे चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य . चीन यूएसए यांच्या व्यापार युद्धाच्या पाश्वभूमीवर चीनच्या लष्करी सामर्थ्यावर चर्चा होणे हे अत्यंत महत्वाचे आहे .                       स्वामी विवेकांनद यांनी त्यांच्या  पहिल्या युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिकेच्या दौऱ्याच्यावेळी चीनची ताकद ओळखली होती  . त्यांनी म्हंटले होते की   "चीन निद्रिस्त ड्रॅगन आहे , जेव्हा हा ड्रॅगन जागा होईल तेव्हा सगळ्या जगाची झोप उडवेल ". सध्याच्या चीनच