पोस्ट्स

ऑगस्ट २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे बदल आपल्या एसटीत कधी होणार?

इमेज
    आपली महाराष्ट्राची एसटी आधीच विविध सोइसवलतीने डबघाईस आलेली असताना, एकनाथ शिंदे यांच्या नेर्तुत्वाखालील मंत्रीमंडळाने तीला 75 वर्षावरील व्यक्तींना पुर्णतः मोफत प्रवास करण्याचा घोषणेने आणखी एका सोईसवलतीचा भार देवून टाकला. एकीकडे आपल्या एसटीचे सवलतीचे ओझे वाढत असताना, आपल्या शेजारील गुजरात राज्यातील एसटीने एक मैलाचा दगड गाठला गेला.  देशभरातील एल .एन. जी.वर चालणारी पहिली एसटी बस चालवण्याचा मान, गुजरात राज्य परीवहन महामंडळाला मिळाला आहे.      गुजरात एसटीच्या विश्वामित्र या विभागातर्फे (बडोदा जिल्हा विभाग) नुकतेच याच्याशी संबधीत बसची प्रादेशिक वाहतूक विभागाकडे नोंदणी करण्यात आली. मुळच्या डिझेल बसमध्ये बदल करत, तीला एल. .एन.जी. इंधनावर चालवण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे. एल. एन.जी या इंधनामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.          एकेकाळी देशात नवनवीन उपक्रम राबवण्याबाबत महाराष्ट्र एसटी अनभिषक्त सम्राट होती. देशात पहिली गोष्ट करायची ती महाराष्ट्र एसटीनेच .महाराष्ट्र एसटीची काँपी नंतर राज्यातील एसटीने करायची, हा सर्वमान्य नियम होता. केंद्रातील सार्वजनिक वाहतूक विभाग देशातील राज