पोस्ट्स

जुलै १७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हम आपके साथ हे

इमेज
              सध्या आपला मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडत असताना भारताचा इशान्य भागात ब्रम्हपुत्रा नदीने अक्षरशः हाहाकार उडवला आहे . इशान्य भारतातील सर्वात मोठे आणि महत्तवाचे राज्य असणाऱ्या आसाममधील 33पैकी 30 जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे .एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काझीरंगा अभारण्याचा 98% भाग पाण्याखाली गेला आहे . ज्यांना भारताच्या प्राकृतीक रचनेची जाण आहे , त्यांना हे पण लक्षात आले असेल की मेघालय, मिझोराम, मणीपूर नागालँड, अरुणाचल प्रदेश,त्रिपूरा या सर्व राज्यात आपणास बांगलादेशातून न जाता भारतीय हद्दीतून जायचे असल्यास आसामशिवाय तरणोपाय नाही .अरुणाचल या राज्याची तर बातच निराळी .मी या आधी सांगितलेल्या राज्यापैकी अरूणाचल  प्रदेश या राज्यात बांगला देशातून सहजतेने जाता येत नाही जर जायचे असल्यास बांगलादेशातून मणीपूर राज्यात तेथून नागालँड राज्यात तिथून मिझोराम राज्यात पहिल्यांदा जावे लागेल .तिथून मग अरुणाचल प्रदेशात जाता येईल. तर असे हे आसाम राज्य सध्या प्रचंड अस्या पूराच्या विळख्यात सापडले आहे .                  इशान्य भारत संपुर्ण भारताच्या अडीच टक्के भुभाग आहे . युनाट