पोस्ट्स

मे ३०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असी आहे आपली एसटी .....!

इमेज
   प्रातिनिधिक चित्र  मित्रांनो , आपल्या महाराष्ट्राची एसटी भारतातील एक प्रमुख सार्वजनिक सेवा आहे जी या एक जूनला 76 व्या वर्षात पदार्पण करत आहे आपल्या एसटी   महामंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या 12 प्रमुख प्रकारच्या बससेवा या आपल्या एसटीमार्फत पुरवल्या जातात . या 12  प्रमुख प्रकारातील एका प्रकारचे 5 उपप्रकार देखील पडतात .  आपली एसटी महामंडळ विविध प्रादेशिक विभाग आणि आगारमधून ही सेवा पुरवली जाते . चला तर एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून   जाणून घेवूया एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा . 1) परीवर्तन सेवा : एसटी महामंडळाची ही सर्वात स्वस्त आणि खेडोपाडी चालणारी सेवा आहे . या सेवेला लालपरी म्हणून देखील ओळखले जाते .  या सेवेचे विठाई , हरीत कुंभ ,  विद्यार्थी सेवा , एम एस बाँडी , साधी बस असे उपप्रकार पडतात . आता जाणून घेवूया याचे उपप्रकार ) विद्यार्थी   सेवा अ) हरीत कुंभ : नाशिकला कुंभमेळा असताना 2014-2015 ला एसटी महामंडळामार्फत ही सेवा सुरु करण्यात आली . या बसेसचा रंग