पाऊले चालती धोक्याची वाट
दिनांक 30 जुलै रोजी नाशिकच्या एका दैनिकात मन विषन्न करून सोडणारी बातमी वाचली. नाशिकच्या जवळपास 80 हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकण्याची शक्यता त्यात व्यक्त करण्यात आली होतो .80 हजार कामगार म्हणजे 80 हजार कुटुंबे यामुळे संकटात होती . चार जणांचे एक कुटुंब धरले तर सुमारे 3 लाख 20हजार लोक यामुळे प्रभावित होणार आहेत. मित्रानों भारतातील औद्योगिकदृष्ट्या एक आघाडीचे ताज्या म्हणून महाराष्ट्र साऱ्या भारताला माहिती आहे . आणि महाराष्ट्रातील चोथ्या अथवा पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून नाशिक नगरी ओळखली जाते .त्या नाशिकमध्ये अशी परिस्थिती आहे . म्हणजे आपण समजू शकता देशाची आर्थिक स्थिती कशी आहे . बर शेती उत्तम चालू आहे , अशी ही परिस्थिती सध्या नाहीये . सध्या समस्त भारत भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे . आणि आपल्या भारतातील काही धुरींनी देशाला सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या पाचपट अर्थव्यवस्था करण्याचा गोष्टी करत आहे. देशाची अर्थव्यवस्था कदाचित एव्हढ्या मोठंग्य प्रमाणात होईलही . मात्र माझ्या मते त्...