पोस्ट्स

एप्रिल ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे आवडते गाणे !

इमेज
आनंद या चित्रपटातील गाण्याविषयीच्या माझा पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकाने मला तूझ्या आवडत्या गाण्याविषयी वाचायला आवडेल. असी प्रतिक्रिया दिल्याने माझ्या आवडत्या गाण्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन. तर माझे आवडते गाणे आहे, जब वी मेट या चित्रपटातील " तूमसे ही" हे गाणे.  मोहित चौहान यांच्या आवाजात रेकाँर्ड केलेले , आणि प्रितम यांनी संगीतबद्ध केलेले गाणे. ज्या गीताची रचना इर्शाद कामील यांनी केली होती. युवा उद्योजक आदित्य कश्यप यांनी नैराश्यातून बाहेर पडत उद्योगाची घडी पुन्हा नव्याने बसवताना गायलेले हे गाणे. सर्व प्रकारच्या व्यस्ततेतून मोकळा वेळ काढत आपल्या छंदाला मोकळा वेळ देत गायलेले गाणे. म्हणजे हे गीत . या गीतानंतर चित्रपट संपुर्ण 180% फिरतो. आतापर्यत नैराश्यामुळे सर्वकाही सोडून विनम्सक अवस्थेत फिरत, प्रसंगी आत्महत्येचा प्रयत्न केलेला युवा उद्योजक स्वतःच्या आयुष्यात नव्याने रंग भरतो, आपल्या अडचणी सोडवण्याचा नव्याने पुर्णतः उत्साहात प्रयत्न करायला लागतो. ज्यात त्याला यशही मिळायला लागते आधीच्या स्थितीपेक्षा त्याची स्थिती खुपच सुधारते.आतापर्यत अपयशी समजला जाणारा युवा उद्योजक आदित्य

जिंदगी है पहेली !

इमेज
      कालचीच गोष्ट आहे. युट्यूबवर विरंगुळ्यासाठी हिंदी गाणी ऐकत असताना एका हिंदी गाण्याचा पर्याय समोर दिसला. आनंद चित्रपटातील  " ये जिंदगी है पहेली,  कभी ये रुलाइ, कभी ये हसाइ," हे ते गाणे. सध्याचा परीस्थितीला चपलाख बसणारे. सध्या परीस्थिती ही आपणाला रडवणारी असली तरी ही स्थिती कायम राहणार नाही, हा आशावाद जागवणारी. एका कँन्सरच्या रुग्णाचा दुर्दम्य इच्छा शक्तीवर कथानक असलेल्या या चित्रपटात सांगितलेल्या संदेशाची सध्या नितांत आवश्यकता आहे.       सध्याच्या काळात वर्तमानपत्राकडे नजर टाकल्यास किमान दोन ते तीन आत्महत्येचा बातम्या दररोज दिसतात. कोरोनामुळे घटलेले उत्पन, उद्भवलेली अस्थिरतेची परीस्थिती यामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती यातून या आत्महत्येचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या मृत्यू समोर दिसत असताना देखील त्यांचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखवता , उलट इतरांना आनंद देणारा खऱ्या अर्थाने रोल माँडेल ठरतो, असे मला वाटते. तसेच बाबू मोशाँय हम सब रंगमंच की कतपुलीया है, हमारी दोर उपर वाले की हात मैं है, कोन कैसे उठेगा, ये कोइ नही जानता,हाहाहा ! तसेच "मिटती है ,वो