पोस्ट्स

नोव्हेंबर १८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदिरा गांधी : एक कणखर पंतप्रधान

इमेज
                 आपल्या भारतात काही व्यक्तीमत्वे असी आहेत की, समोरच्याला फक्त त्याचे नाव सांगावे, सबंधीत व्यक्ती बाकीचे सर्वकाही समजून जाते. भारताच्या माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी या त्यापैकीच एक .19 नोव्हेंबर ही त्यांची जयंती. त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना मानाचा मुजरा .             अनेकांना इंदीरा गांधी यांचे नाव घेतल्यावर फक्त आणीबाणीचीच आठवण होते. मात्र खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, सिक्कीमला भारतात पुर्णतः समाविष्ट करुन घेणे.  पाकिस्तानची प्रमुख आर्थिक ताकद असणारा पुर्व पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आणणे, आदी अनेक कार्ये त्यांचा कार्यकाळात झाली.                        पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लामाबादच्या निर्मितीसाठी लागलेल्या पैसामध्ये पुर्व पाकिस्तानमधून येणाऱ्या कररुपी उत्पनाचा वाटा जवळपास 90 ते95% होता. ज्याला इंदिरा गांधीनी स्वतंत्र देश करुन पाकिस्तानचे आर्थिक कबंरडेच मोडले. एका बाजुला पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडताना भारतातील तळागाळातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या हेतूने खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. सन