पोस्ट्स

मार्च १२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पश्चिम आशियातील बदलती सत्ता समीकरणे आणि भारत

इमेज
शुक्रवार १० मार्च २०२३ हा दिवस जागतिक राजकारणाच्या विचार करता अत्यंत वादळी ठरला कारण .पश्चिम आशियातील हाडवैरी असणाऱ्या इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये चीनच्या मध्यस्तीने काही प्रमाणत मैत्रीचे संबंध स्थापन होण्याची पश्चिम आशियातील  सत्ताकारणाचे समीकरणे मोठ्या प्रमाणत बदल्याची क्षमता असणारी  घटना या दिवशी घडली एकेकाळी अमेरिकेचा पश्चिम आशियातील घनिष्ठ मित्रदेश म्हणून ज्यास ओळखले जात होते मात्र सध्या संबंधात काहीशी कटुता आली आहे असा  सौदी अरेबिया आणि १९७९पासून अमेरिकेचा हाडवैर असलेल्या इराण यांनी अमेरिकेचा वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या चीनच्या मदतीने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरवात केल्याची ती घटना आहे इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये  इस्लामी जगताचा नेता कोण होणार?  तसेच इराणची संस्कृती श्रेष्ठ कि सौदी अरेबियाची संस्कृती श्रेष्ठ या सारख्या अनेक बाबतीत स्पर्धा असल्याने  आणि जगात एकमेव शिया मुस्लिम बांधव  बहुसंख्य असलेल्या इराकमध्ये  सौदी अरेबिया या देशात  अल्पसंख्याक असलेल्या शिया मुस्लिम बांधवांवर  होत असलेल्या अपमानांमुळे मोठ्या प्रमाणत शत्रुत्व होते ज्याचा परिणाम