पोस्ट्स

फेब्रुवारी ११, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सकारात्मक पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण, "पोलादी माणसं, नाशिक जिल्हा भाग १"

इमेज
               सध्याचा काळात सातत्याने पत्रकारिता  नकारात्मकतेचा प्रचार प्रसार करते,आरोप करण्यात येतो. आजच्या माध्यमातील बातम्या बघितल्यस त्यात सातत्याने खुन,दरोडा , गुन्हेगारी, बलात्कार,आदी विषयक बातम्या दिसत असल्याने हा आरोप खरा आहे,असे पटायला लागते.मात्र सर्वच माध्यमे तसीच आहेत, असे सर्वसाम्यनीकरण करणे अयोग्य आहे. जरी संख्येने कमी असले तरी काही पत्रकार सकारात्मक पत्रकारीता करत समाजात आपले एक चांगले स्थान निर्माण करत आहेत.ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी हे अस्या मोजक्या पत्रकारांपैकीच एक. समाजात आदर्श घ्यावा अस्या उद्योगपतींचे कार्य ते जिल्हावार पुस्तक रुपाने प्रसिद्ध करत आहेत.त्यांची  सोलापूर, हिंगोली,बीड, अकोला वाशीम,अहमदनगर अस्या वीस जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणारी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.याच मालिकेतील नाशिक जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणाऱ्या २भागांच्या  पुस्तकांपैकी पहिल्या भागाचे पुस्तक मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत  वाचले.                      २८०पानाच्या या पुस्तकात नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या,२५ उद्योगपतीं