पोस्ट्स

जुलै १३, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*पूजा खेडकर प्रकरणाने जन्म दिलेले काही प्रश्न*

इमेज
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या, प्रशासनाच्या पोलादी चौकटीत बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश करणाऱ्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या समस्त भारतात गाजत आहे. पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडेकर यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक सदस्यीय आयोग नेमला आहे. आयोगाच्या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्यास  सेवेतून बडतर्फ करण्यासह,  नॉन क्रिमीलेयर नसताना नॉन क्रिमीलेयर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवल्यामुळे, खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखवून प्रवेश केल्यामुळे होणारी कार्यवाही म्हणजेच  दोन वर्ष कारावास तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून सेवेत प्रवेश केल्याप्रकरणी तीन वर्षाच्या सक्षम कारावासाची क्षिक्षा होऊ शकते. आता त्यांना  क्षिक्षा होइल तेव्हा होईल, किंवा त्या निर्दोष ठरतील. आता यातील काय होते?, ते येणार काळच ठरवेल, त्याबाबत आताच काही भाष्य करणे धाडसाचे ठरेल. असो.    मात्र पुजा खेडकर प्रकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. नवी दिल्लीच्या मुखर्जी नगर आणि करोल बाग या परीसरात किंवा आपल्या पुण्याचा नवी पेठ,सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि लग